किती हिंदू त्यांच्या नेत्यांना त्यांच्या चुका सांगतात ? हिंदूंचे नेते त्यांचे ऐकतात का ? मुसलमान नेते किती कट्टर असतात आणि त्यांच्यावर धर्मांधांचा किती दबाव असतो, याचे हे आणखी एक उदाहरण आहे. हिंदू यातून शिकतील का ?
मुंबई : एम्आयएम्चे नेते वारीस पठाण यांनी २३ सप्टेंबरला एका घरगुती गणपतीसमोर ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत ‘गणपती तुम्हा सगळ्यांची दुःखं दूर करो’ असे म्हटले होते. तशी त्यांची चित्रफीत प्रदर्शित झाल्यावर त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. त्यानंतर त्यांनी क्षमा मागणारी एक चित्रफीत प्रदर्शित केली.
त्यात त्यांनी म्हटले आहे, ‘‘माणसाकडून चुका होतात. तशी माझ्याकडून चूक झाली आहे. पुन्हा कधी अशी चूक होणार नाही. यापुढे ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणणार नाही.’’ यात त्यांनी कलमा म्हणत सगळ्यांना सलाम केला आहे आणि अल्ला त्यांना क्षमा करील, असे म्हणून दुवा मागितला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात