- निरपराध हिंदुत्वनिष्ठांना आतंकवादी ठरवून त्यांच्या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी करणारे माकपवर बंदी घालण्याची मागणी करतील का ?
- पुरो(अधो)गामी माकपच्या विरोधातील अशा बातम्या भारतीय प्रसारमाध्यमे दडपतात, हे लक्षात घ्या !
The Left cadres protesting in Hill Cart road in Siliguri poured kerosene oil on the police personnel.
They were protesting against the police firing on students, which claimed two lives in Islampur in Dinajpur district of West Bengal. #ReporterDiary (@manogyaloiwal) pic.twitter.com/G750dsNqFM— India Today (@IndiaToday) September 25, 2018
सिलीगुडी (बंगाल) : येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एका पोलीस अधिकार्यावर केरोसिन ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. (तृणमूल काँग्रेसच्या राज्यातील अराजक ! जिथे पोलीसच असुरक्षित आहेत, तिथे जनतेचे रक्षण कसे होणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या वेळी अन्य पोलिसांनी त्यांना वाचवले. पोलिसांनी या प्रकरणी माकपच्या २ कार्यकर्त्यांना अटक केली आहे, तर अन्य १० जणांना अटक करण्यासाठी काही ठिकाणी छापे घातले.
बंगालच्या दिनाजपूर जिल्ह्यातील इस्लामपूर येथे पोलिसांच्या गोळीबारात २ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी माकपचे कार्यकर्ते आंदोलन करत असतांना ही घटना घडली. माकपचे कार्यकर्ते या वेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुतळा जाळणार होते. या वेळी पोलिसांनी त्यांच्याकडून पुतळा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला असता कार्यकर्त्यांनी पोलीस अधिकार्यावर केरोसिन ओतले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात