हिंदुत्व हे हिंदु धर्माशी निगडित असल्याने त्याविषयी निर्णय घेण्यापूर्वी हिंदूंचे धर्माचार्य, संत यांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे !
नवी देहली : नव्वदच्या दशकात सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश जे.एस्. वर्मा यांनी हिंदुत्वाविषयी ‘हिंदुत्व ही जीवन जगण्याची कला आहे’, हा दिलेला निर्णय दोषपूर्ण होता, अशी मुक्ताफळे स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वांत अयशस्वी समजले जाणारे काँग्रेसचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी उधळली. कम्युनिस्ट नेते ए.बी. वर्धन स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.
डॉ. सिंह पुढे म्हणाले, ‘‘न्यायाधीश वर्मा यांच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाच्या ९ सदस्यांच्या खंडपिठाने शिक्कामोर्तब केले होते. यामुळे संविधानिक पवित्रतेला धक्का बसला आहे. ‘धर्मनिरपेक्षता’ हा संविधानाचा मूलभूत ढाचा आहे. (जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करणारे डॉ. मनमोहन सिंह ! आणीबाणीनंतर इंदिरा गांधींनी घटनेत ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द घुसडला, हे सत्य सांगण्याचे धारिष्ट्य डॉ. सिंह का दाखवत नाहीत ? तथाकथित धर्मनिरपेक्षतेमुळे हिंदूंची सर्वाधिक हानी झाली आहे आणि अजूनही होत आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्याचे रक्षण करणे, हे न्यायपालिकेचे आद्यकर्तव्य असून न्यायपालिकेने त्याकडे कानाडोळा करता कामा नये. या निर्णयामुळे आपला राजकीय संवाद असंतुलित करण्यात आला. त्यामुळे हा निर्णय पालटला गेला पाहिजे, असे अनेकांना वाटते.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात