Menu Close

उत्तरप्रदेशमध्ये गरिबांना धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणार्‍या कुलदीप यादव यास अटक

लक्ष्मणपुरी (लखनौ) : उत्तरप्रदेशमधील गरीब लोकांना आमीष दाखवून त्यांना धर्मांतर करण्यास प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी कुलदीप यादव यास पोलिसांनी  महाराजगंज जिल्ह्यातील लोहियानगर येथून अटक केली. त्याच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (बाटगे अधिक कडवे असतात, या म्हणीची प्रचीती देणारी घटना ! पुरो(अधो)गामी याविषयी गप्प का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ‘महाराजगंज येथे श्रीमती प्रभावतीदेवी मेमोरियल संस्थान येथे काही लोक ख्रिस्ती धर्मातील चमत्कारांची बतावणी करून चित्रफीत आणि अन्य साहित्य विकून धर्मांतर करत आहेत’, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळावरून ख्रिस्ती धर्माची पुस्तके आणि इतर प्रचारसाहित्य कह्यात घेतले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *