कर्नाटकच्या चिक्कमगळुरू येथे हिंदु धर्मजागृती सभा !
चिक्कमगळुरू (कर्नाटक) : आज कर्नाटकात अडीच लाख अनधिकृत बांगलादेशी रहात आहेत आणि शासनाकडून त्यांना ओळखपत्र, रेशनकार्ड इत्यादी देण्यात येते, हे दुर्दैवी आहे, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य श्रीराम सेनेच्या श्री. महेशकुमार कट्टीनामाने यांनी हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित धर्माभिमान्यांना संबोधित करतांना केले. (कर्नाटकातील हिंदूंनी पुढील निवडणुकीत अशा देशविरोधी काँग्रेसला घरचा रस्ता दाखवावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) हिंदु जनजागृती समितीने ६ मार्च या दिवशी कर्नाटकच्या चिक्कमंगळुरू येथील लायन्स सेवा भवनामध्ये या सभेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. मोहन गौडा आणि सनातन संस्थेच्या कु. भव्या गौडा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
१. श्री. कट्टीनामाने पुढे म्हणाले की, आज बहुतांश हिंदू झोपले आहेत. संघटित असलेल्या हिंदुत्वनिष्ठ संघटनाच हिंदूंवरील अत्याचारांना परतवून लावण्यास सक्षम आहेत.
२. समितीचे श्री. मोहन गौडा म्हणाले, कर्नाटक शासन आणू पहात असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकात हिंदुविरोधी तरतुदी आहेत. या माध्यमातून हिंदुद्वेष्ट्यांचे लांगूलचालन करण्यासाठी काँग्रेस शासनाने हिंदु धर्माला कमी लेखण्याचा प्रयत्न चालवला असून हिंदु संतांना खोट्या आरोपांखाली कारागृहात डांबण्याचे धोरण सिद्ध करण्यात येत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाचा विरोध करण्यासाठी समिती राज्यव्यापी आंदोलन उभारणार आहे. ढोंगी धर्मनिरपेक्षतेमुळे हिंदूंना मोठी किंमत चुकवावी लागली आहे. हिंदूंवर होणारे विविध अत्याचारांवर हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव मार्ग आहे. यासाठी हिंदु जनजागृती समितीने राष्ट्रीय पातळीवर मोहीम आरंभली आहे. धर्माभिमानी हिंदु राष्ट्र-धर्माच्या या कार्यात सहभागी होऊ शकतात.
३. समितीच्या सौ. राधिका प्रभू यांनी समितीच्या राष्ट्र अन् धर्म कार्याची उपस्थित हिंदु धर्माभिमान्यांना ओळख करून दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात