हिंदू सहिष्णुता दाखवत अन्य धर्मियांच्या धार्मिक गोष्टीत अडथळा आणत नाहीत, तर धर्मांध प्रार्थनास्थळाजवळून मिरवणुका जात असतांना दगडफेक करतात. अशा वेळी धर्मांधांना सहिष्णुतेचे डोस का देण्यात येत नाहीत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नाशिक : येथेे श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या वेळी ‘अजान’ चालू होताच ढोलवादन थांबवून स्तब्ध उभे रहात हिंदूंनी सहिष्णुतेचे प्रदर्शन केले. अशा प्रकारे धार्मिक भावनांचा आदर करणार्या गुलालवाडी व्यायामशाळा पथकाचा मुसलमानांनी नंतर सत्कार केला.
येथील दूधबाजार परिसरात गुलालवाडीचे लेझीम-ढोल पथक वादन करत होते आणि दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बाजूलाच असलेल्या हेलबावडी मशिदीत अजान चालू झाली. अजान ऐकताच २०० वादक स्तब्ध उभे राहिले. अजान पूर्ण झाल्यावर पुन्हा वादन चालू करत हे पथक पुढे मार्गस्थ झाले. मुसलमानांनी गुलालवाडी पथकाचा सत्कार करण्याची पोलिसांकडे विनंती केली. त्यानुसार पोलीस आयुक्त कार्यालयात मशिदीच्या सदस्यांसह मुसलमानांनी या पथकाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. (गुलालवाडी पथकाचा सत्कार करणारे प्रार्थनास्थळांतून मिरवणुकांवर दगडफेक करणार्या धर्मबांधवांना खडसावणार आहेत का ? तसेच ‘गणपति बाप्पा मोरया’ म्हणून चूक केली’, असे सांगणार्या आमदार वारीस पठाण यांचे ते प्रबोधन करणार का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments