Menu Close

मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात १३ बलात्कार करणार्‍या धर्मांधाला अटक

पालकांनो, वासनांध मुसलमानांपासून आपल्या मुलींचे रक्षण करण्यासाठी त्यांना स्वरक्षणाचे धडे द्या !

मुंबई : मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर आदी परिसरात साखळी पद्धतीने १३ बलात्कार करून पसार असलेल्या रेहान कुरेशी या धर्मांधाला २६ सप्टेंबरला रात्री मुंबई येथील पोलिसांनी नालासोपारा येथे अटक केली. आतापर्यंत त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात ११ तक्रारी नोंद झाल्या आहेत. अनेक युवतींनी भीतीमुळे अद्याप तक्रारीही दिल्या नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे कुरेशी याने बलात्कार केलेल्या युवतींची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. चौकशीअंती २७ सप्टेंबर या दिवशी पोलिसांनी कुरेशी याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे.

कुरेशी हा एका खाजगी आस्थापनामध्ये ‘सेल्समन’चे काम करत होता. तो ‘सी.सी.टी.व्ही.’मध्ये कुरेशी दिसून आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अन्वेषणासाठी कह्यात घेतले. कुरेश अल्पवयीन युवतींवर लक्ष ठेवून घरात कुणी नाही, याचा अंदाज घेऊन दार ठोठवायचा. मुलीने दरवाजा उघडला की, भावनिक शब्दांचा उपयोग करून सभ्य गृहस्थाप्रमाणे बोलून मुलीला वडिलांनी बोलावले असल्याचे सांगायचा. त्यानंतर अल्पवयीन युवतीला निर्जन ठिकाणी नेऊन जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार करायचा. कुरेशी हा विरार येथे आल्याची माहिती पसरल्यानंतर तेथील नागरिक आपापल्या परिसरात सतर्क राहून अनोळखी व्यक्तीची माहिती घेत होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *