विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) : येथे काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले होते. त्यात हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळावरील सदस्य श्री. नरेश पुरोहित सहभागी झाले होते. या आंदोलनात ‘सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या मागणीला विरोध करणे, तसेच नक्षलवाद्यांच्या समर्थकांवर कारवाई करणे’, या मागण्या करण्यात आल्या होत्या. या आंदोलनातील मान्यवरांचे विचार ऐकल्यावर श्री. पुरोहित यांनी त्याच दिवशी राजस्थानी समाजातील लोकांसाठी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर प्रवचन आयोजित केले. यात २० हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते. या वेळी सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते.
या वेळी समितीचे श्री. चेतन जनार्दन यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, आज भारतात धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदुत्व नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. सध्याचा धर्मनिरपेक्षतावाद हा हिंदुविरोधी आहे. तेलंगण आणि आंध्रप्रदेश राज्यांतील स्थिती पाहिली, तर येथे हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.
क्षणचित्रे
१. प्रवचन ऐकल्यावर अनेकांनी शंकानिरसन करून घेतले.
२. राजस्थानी समाजाच्या महिलांसाठी प्रत्येक पौर्णिमेला एक सत्संग आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.