- रा.स्व. संघाचे नसलेले आणि भाजपमध्ये काही वर्षांपूर्वीच आलेले डॉ. स्वामी पक्ष आणि संघटना, तसेच पद आणि सत्ता यांचा नाही, तर देश आणि हिंदु धर्म यांचा विचार करतात. त्यामुळे ते अशा प्रकारे बोलू शकतात, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !
- बांगलादेश भारताच्या कह्यात आल्यावरही तेथील हिंदूंवरील आक्रमणे थांबतील याची शाश्वती देता येत नाही; कारण आजही केंद्रात आणि देशातील २० राज्यांत भाजपचे राज्य असतांना हिंदूंवर धर्मांधांकडून होणारी आक्रमणे अन् अत्याचार होतच आहेत, ही वस्तूस्थिती आहे !
आगरतळा (त्रिपुरा) : जर बांगलादेशमध्ये हिंदूंवरील आक्रमणे चालूच रहात असतील, तर भारताने बांगलादेशावर आक्रमण करून त्याला स्वतःच्या कह्यात घेतले पाहिजे, अशी मागणी भाजपचे राज्यसभेतील खासदार आणि ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केली आहे. ते येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
१. डॉ. स्वामी म्हणाले की, भारत बांगलादेशाला नेहमीच पाठिंबा देत आला आहे आणि देत राहील; मात्र बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या देशातील वेड्यांना (धर्मांधांना) हिंदूंच्या मंदिरांना उद्ध्वस्त करण्यापासून, हिंदूंच्या मंदिरांच्या मशिदी करण्यापासून आणि हिंदूंना मुसलमान बनवण्यापासून रोखले पाहिजे. हा अत्याचार कदापि सहन करता येणार नाही.
२. डॉ. स्वामी यांनी यापूर्वी मालदीववर आक्रमण करण्याचीही मागणी केली होती. तेथील निवडणुकांमध्ये गोंधळ होण्याची शक्यता असल्याने त्यांनी अशी मागणी केली होती.
पाकला आतंकवादी, सैन्य आणि आयएस्आय चालवतो, तर इम्रान खान केवळ शिपाई !
डॉ. स्वामी येथे आयोजित एका कार्यक्रमात म्हणाले, ‘‘पाकिस्तानसमवेत चर्चा करण्याचे कोणतेही औचित्य नाही; कारण पाकला आयएस्आय, सैन्य आणि आतंकवादी चालवत आहेत. इम्रान खान केवळ कागदावर पंतप्रधान आहेत. ते केवळ शिपाई आहेत. पाकमधील बलुची आणि सिंधी यांना भारताकडून स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली पाहिजे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात