पलवल (हरियाणा) : देशातील मुख्य न्यायालये धर्माची उपेक्षा करून धर्म बिघडवण्याचे काम करत आहेत. न्यायालये धर्मशास्त्राच्या विरोधात जाऊन कृती करत आहेत, असे विधान द्वारका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी येथे आयोजित केलेल्या धर्मसभेत केले. शंकराचार्य पुढे म्हणाले की, मंदिर किंवा मशीद बनवण्याचे काम सरकारचे नसते; कारण सरकार धर्मनिरपेक्ष असते. अयोध्येमध्ये राममंदिर बनवण्याचे नाटक अधिक होत आहे आणि प्रत्यक्षात काहीच होत नाही. तेथे बाबरी मशीद नव्हती; मात्र त्याचा बागुलबुवा निर्माण करण्यात आला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात