जयपूर : राजस्थान उच्च न्यायालयाने पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या भक्त शिल्पी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांची कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे. पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या प्रकरणात त्यांनाही २० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
प्रथम शिल्पी, नंतर शरद आणि शेवटी मी कारागृहातून बाहेर येणार !- पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू
काही दिवसांपूर्वी पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची कारागृहातून दिलेल्या संदेशाची चित्रफीत सामाजिक माध्यमांतून सर्वत्र प्रसारित झाली होती. या चित्रफितीत त्यांनी ‘प्रथम शिल्पी यांना बाहेर काढीन, नंतर शरद आणि शेवटी मी बाहेर येईन’, असे म्हटले होते. त्यानुसार आता शिल्पी कारागृहातून बाहेर येणार असल्याने त्यांचे म्हणणे खरे ठरल्याचे म्हटले जात आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात