भारतात अशी कोणी बंदी घालण्याचा प्रयत्न केला, तर लगेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळा काढण्यात येतो !
बाली (इंडोनेशिया) : येथील हिंदूंच्या मंदिरात तोकड्या कपड्यांत येणार्या पर्यटकांवर बंदी घालण्यात आली आहे.
१. इंडोनेशिया या मुसलमानबहुल देशातील बाली या बेटावर हिंदु धर्मीय बहूसंख्य आहेत. तेथे हिंदूंची प्राचीन मंदिरे असून येथे अनेक हिंदु सण साजरे केले जातात. या निसर्गरम्य बेटावर विदेशातून, विशेषत: ऑस्ट्रेलियातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. हे पर्यटक ‘बिकीनी’सारख्या तोकड्या कपड्यांत मंदिरात प्रवेश करून ‘सेल्फी’ काढण्यासमवेत अश्लील चाळे करतात. तसेच पाश्चिमात्य वाद्ये वाजवणे, मंदिरातील मूर्ती चोरणे असेही प्रकार घडतात. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य मोठ्या प्रमाणावर भंग होते.
२. हे अनुचित प्रकार लक्षात घेऊन बाली येथील ‘इंडोनेशिया हिंदू सोसायटी’ या संघटनेने मंदिरात प्रवेश घेण्यासाठी काही नियम बनवण्यास पुढाकार घेतला आहे. त्यासाठी शासकीय अधिकारी आणि हिंदूंचे धार्मिक नेते यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच आधी २४ घंटे खुली असणारी मंदिरे आता केवळ प्रार्थना करण्याच्या वेळेतच खुली ठेवण्यात येणार आहेत. तसेच मंदिरात तोकड्या कपड्यांत येणार्या पर्यटकांवर बंदी घालण्यात आली आहे.
३. दक्षिण आशियात जेथे हिंदूंची मंदिरे मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहेत, त्या थायलंड आणि कंबोडिया या देशांनीही असे नियम बनवले आहेत. बँकॉक येथील सूर्योदय मंदिरात एका समलिंगी जोडप्याने अश्लील चाळे करून त्याचे चित्रीकरण करण्याचा प्रकार घडला होता. त्यांना अटक करून शिक्षाही झाली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात