- दुर्गापूजा मंडळांना बंगाल सरकारकडून २८ कोटी रुपये दिल्याने मौलवींना पोटशूळ !
- दुर्गापूजा मंडळांना आर्थिक साहाय्य म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हिंदूंना खुश करण्याचा ममता(बानो) सरकारचा प्रयत्न !
कोलकाता : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी राज्यातील दुर्गापूजा उत्सव साजरा करणार्या मंडळांना २८ कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. यानंतर राज्यातील मौलवींनी रस्त्यावर उतरून आंदोलन चालू केले आहे. त्यांनी म्हटले की, दुर्गापूजा उत्सव मंडळांना देण्यात येणार्या पैशाविषयी आम्हाला आक्षेप नाही, तर आम्हाला मिळणारे मानधन अडीच सहस्र रुपयांवरून १० सहस्र रुपये करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. (मौलवींना सरकारकडून पैसे घेण्याचा काय अधिकार ? भारतीय लोकशाही निधर्मी असतांना धर्माच्या आधारावर सरकार अशा प्रकारचे मानधन कसे देऊ शकते ? जर मौलवींना असे मानधन दिले जाणार असेल, तर मंदिरांतील पुजार्यांनाही ते मिळायला हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) राज्यात २८ सहस्र दुर्गापूजा मंडळे आहेत. त्यांना प्रत्येकी १० सहस्र रुपये देण्यात येणार आहेत.
मौलवी आणि मुसलमान विचारवंत यांची संस्था ‘अखिल बंगाल अल्पसंख्यांक युवा संघा’ने राज्यातील सर्व मदरशांसाठी प्रत्येकी २ लाख रुपये देण्याची मागणी केली आहे, तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने मुसलमानांना १६ जागा द्याव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात