पुणे : युवकांनी समाजकार्य आणि धर्मकार्य करायचे असेल, तर मद्यपी न होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा आदर्श ठेऊन काम करावे आणि संघटना वाढवावी. येत्या काळात हिंदुत्वासाठी आम्ही सर्वजण मिळून मोठे संघटन निर्माण करू, असे प्रतिपादन श्री. अभिजित बोराटे यांनी केले. हडपसर येथे ३० सप्टेंबर या दिवशी हिंदवी स्वराज्य युवा संघटनेच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला ६० हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी यांनी ‘पुन्हा हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. ‘‘सध्या न्याय, शिक्षण प्रशासन व्यवस्थेची परिस्थिती हिंदवी स्वराज्याच्या अगदी विपरीत आहे. स्वभाषाही प्रशासकीय आणि न्यायालयीन कामात वापरता येत नाही. जिथे आपल्या स्वभाषेलासुद्धा मूल्य नाही, तर स्वातंत्र्य खरच मिळाले का?’’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
क्षणचित्र
श्री. नागेश जोशी यांचे मार्गदर्शन झाल्यावर सूत्रसंचालकांनी उत्स्फूर्तपणे ‘आम्ही सर्व कार्यकर्ते हिंदु राष्ट्र आणण्यासाठी समर्पित आहोत’, असे सांगितले. त्याला सर्वांनी टाळ्या वाजवून अनुमोदन दिले