नागपूर : हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट यांनी त्यांच्या नागपूर येथील २३ ते २५ सप्टेंबर २०१८ या वास्तव्याच्या काळात शहरातील विविध धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, व्यावसायिक यांच्याशी संपर्क केले. सर्वांनी समितीचे कार्य सविस्तर जाणून घेतले. तसेच वेळोवेळी समितीच्या कार्यात सहभागी होण्याचे आश्वासनही दिले. त्यातील काही मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे :
१. हिंदु विधीज्ञ परिषद अधिवक्त्यांचे जे संघटन करीत आहेत, ते पुष्कळ महत्त्वाचे आणि कार्याच्या दृष्टीने कायदेशीर साहाय्य होईल. हिंदु जनजागृती समितीचे कार्य खरेच योग्य दिशेनी चालू आहे. आम्ही समितीच्या उपक्रमात सहभागी होऊ, आमच्या कार्यकर्त्यांसाठी धर्मशिक्षणवर्ग आयोजित करू, असे प्रतिपादन भाजपचे मध्य विभाग महामंत्री श्री. अमोल ठाकरे यांनी केले. त्यांनी श्री. घनवट यांच्याकडून समितीचे कार्य सविस्तर जाणून घेतले. हिंदु धर्मजागृती सभेची ध्वनीफीत पाहून ते प्रभावित झाले.
२. लोकमान्य सांस्कृतिक आणि प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष अधिवक्ता रमण सेनाड हे अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे नेतृत्व करतात. नागपूरमधील ‘मंदिर बचाओ’ या मोहिमेत स्वतः नेतृत्व करून त्यांनी अनेक मंदिर विश्वस्तांना संघटित केले. या लढण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदांचे आयोजन, तसेच महापौर कार्यालयात तीव्र आंदोलन केले. या आंदोलनाचा परिणाम म्हणजे शासनाने त्वरित मंदिरावरील कारवाई थांबवली आणि ‘नवीन सूची सिद्ध करू’, असे सांगितले. लोकमान्य प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून शौर्य जागृतीकरीता स्वतः शस्त्र प्रशिक्षण देतात. त्यांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी आत्मियता आहे.
३. श्रीराम सेनेचे नागपूर येथील उपाध्यक्ष श्री. आकाश साफलेकर, तसेच श्री. रंजीत साफलेकर म्हणाले, ‘‘युवा हिंदूंना धर्माच्या बाजूने जोडण्यास साहायता हवी आहे. त्यासाठी समितीला विषय मांडण्यासाठी बोलवू. हिंदु विधीज्ञ परिषदेने केलेले अधिवक्त्यांचे संघटन कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणारे आहे.’’
४. नागपूर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आणि उद्योगपती श्री. आशुतोष गोटे यांनीही ‘उद्योगपती राष्ट्रीय अधिवेशनला येणार’, असे आश्वासन दिले.