भाजपमधील केवळ एकच खासदार असे म्हणण्याचे धाडस दाखवतो. यावरूनच भाजपला राममंदिराविषयी किती कळवळा आहे, हे लक्षात येते !
उन्नाव (उत्तरप्रदेश) : जर वर्ष २०१९ च्या पूर्वी अयोध्येत भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले गेले नाही, तर मी साधू आणि संत यांच्या बाजूने उभा राहीन, अशीचेतावणी येथील भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी दिली आहे.
साक्षी महाराज म्हणाले की, मी आज जो काही आहे तो केवळ भगवान श्रीरामांच्या कृपेने आहे. त्यांच्या कृपेमुळेच मी येथपर्यंत पोहोचलो आहे. भाजपही आज सत्तेवर आहे ते श्रीरामांच्या आणि संतांच्या कृपेमुळेच.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात