Menu Close

उत्तराखंडमधील भाजपचे आमदार संजय गुप्ता यांचे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात ‘लव्ह क्रांती अभियान’

  • ‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात नाही’, असे म्हणणार्‍या भाजपच्या गृहमंत्र्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
  • केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असतांना या पक्षाच्या आमदारांना असे अभियान का राबवावे लागते ? ‘लव्ह जिहाद’ हिंदु तरुणींच्या मुळावर उठला असल्याने संबंधितांवर कारवाई होत नसेल, तर भाजपला सत्तेत बसवून हिंदूंना त्याचा उपयोग तरी काय ?

देहराडून (उत्तराखंड) : उत्तराखंडच्या लक्सर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार संजय गुप्ता यांनी येथे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात ‘लव्ह क्रांती अभियान’ राबवण्याचे घोषित केले आहे. या अंतर्गत ते मुसलमान तरुणींवर प्रेम करणार्‍या आणि त्यांच्याशी विवाह करू इच्छिणार्‍या, अशा ५०० हिंदु युवकांना साहाय्य करणार आहेत. ‘लव्ह जिहाद’ला ‘लव्ह क्रांती’ने उत्तर दिले जाईल, असे गुप्ता यांनी म्हटले आहे. (‘लव्ह जिहाद’ला उत्तर म्हणून ‘लव्ह क्रांती’ होऊ शकत नाही. हिंदूंना संघटित करणे आणि हिंदु युवतींना धर्मशिक्षण देणे, हाच त्यावर उपाय आहे ! मुसलमान मुलीशी हिंदूंनी विवाह केला, तर आपले आणि त्यांचे संस्कार, परंपरा, सर्वच गोष्टींत आकाशपाताळ इतका भेद आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे ! भाजपवाल्यांना धर्मशिक्षण नसल्यामुळेच ते अशा प्रकारचे अभियान राबवतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

१. गुप्ता म्हणाले की, अनेक पालकांनी त्यांच्याकडे तक्रार केली आहे की, त्यांच्या मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्या आहेत. मुसलमान नेते ‘लव्ह जिहाद’ला साहाय्य करत आहेत. यामुळेच ‘लव्ह क्रांती अभियान’ राबवण्याचा निर्णय घेतला.

२. राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी गुप्ता यांच्या अभियानाविषयी सांगितले की, मला अशा कोणत्याही अभियानाची माहिती नाही; मात्र राज्यात नाव लपवून विवाह करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत, असे त्यांनी मान्य केले. (जर त्यांना अशा घटना माहिती आहेत, तर त्यावर ते काय कारवाई करत आहेत आणि तशा घटना घडणार नाहीत, यासाठी काय प्रयत्न करत आहेत, हे त्यांनी हिंदूंना सांगायला हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

काँग्रेसकडून लव्ह क्रांती अभियानाला विरोध

काँग्रेसचे अध्यक्ष एकीकडे हिंदूंना खुश करण्यासाठी मंदिरांमध्ये जाऊन ते ‘हिंदु’ असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर काँग्रेसचे पदाधिकारी ‘लव्ह जिहाद’चे समर्थन करून धर्मांधांचे लांगूलचालन करत आहेत !

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रीतम सिंह म्हणाले की, आता निवडणुका आल्याने भाजप ‘लव्ह जिहाद’च्या नावाने लोकांचे लक्ष वळवून ध्रुवीकरणाचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री स्वतः या अभियानाला साहाय्य करत आहेत. या अभियानाचा लोकांनी विरोध केला पाहिजे. (उत्तराखंडमध्ये बहुसंख्य हिंदू आहेत आणि त्यांना ‘लव्ह जिहाद’मुळे त्रास होत आहे, ही वस्तूस्थिती आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *