सातारावासीय आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या निवेदनांना केराची टोपलीच दाखवण्यात आली, असेच यावरून सिद्ध होते. यावरून हिंदूसंघटनाची अपरिहार्यता लक्षात येते !
सातारा : गेली २ वर्षे रखडलेला ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर सामाजिक स्मृती पुरस्कार’ सातारा नगरपालिकेच्या वतीने पुन्हा देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. या पुरस्काराला समस्त सातारावासीय आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी प्रखर विरोध आहे; मात्र त्याला न जुमानता १४ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ६ वाजता शाहू कलामंदिर येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे. प्रसिद्ध अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना हा पुरस्कार देण्यात येईल.
यापूर्वीही समस्त सातारावासीय आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने नगरपालिकेचे सर्वच नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन ‘घोटाळेबाज डॉ. दाभोलकर यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येऊ नये’, अशी मागणी करण्यात आली होती. कलम ३०८ अन्वये जिल्हाधिकार्यांकडे तक्रार देऊनही पालिका प्रशासनाने पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. (डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये असलेले लक्षावधी रुपयांचे घोटाळे माहितीच्या अधिकारातून उघड झाल्याने समितीवर विशेष लेखापरीक्षक नेमण्यात यावा, असा अहवाल सातारा येथील साहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी दिला होता. असे असतांनाही हा पुरस्कार दिला जात असेल, तर तो सातारावासीय आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या भावनांचा अनादरच आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात