Menu Close

प्रयाग येथे कुंभपर्वासाठी जाणार्‍या प्रवासी भाविकांवर रेल्वेकडून अधिभार !

भाजपच्या राज्यात हिंदूंवर ‘जिझिया कर’, तर हज यात्रेसाठी अनुदान चालूच !

प्रयाग : पुढील वर्षी जानेवारी मासामध्ये येथे होणार्‍या कुंभपर्वाच्या वेळी रेल्वेने येणार्‍या भाविकांकडून १० ते ४० रुपये अधिभार घेण्यात येणार आहे. कुंभपर्वाच्या कालावधीत हा अधिभार द्यावा लागणार आहे. उत्तर-मध्य रेल्वेचे मुख्य वाणिज्य प्रबंधक एम्.एन्. ओझा म्हणाले की, पर्वाला येणार्‍या यात्रेकरूंना सुविधा देण्यासाठी हा अधिभार लावण्यात आला आहे. (अधिभार घेऊन रेल्वेकडून सुविधा मिळतील, याची अपेक्षा करता येईल का ? आताही प्रवासी रेल्वेची तिकिटे काढतात त्या पैशात प्रवाशांना रेल्वे किती सुविधा देते, हे जगजाहीर आहे ! मागील कुंभपर्वाच्या वेळीही असाच अधिभार घेण्यात आला होता आणि त्या वेळी रेल्वेस्थानकावर चेंगराचेंगरी होऊन अनेक जणांचा मृत्यू झाला होता. आता रेल्वे अशा गर्दीवर कसे नियंत्रण ठेवणार आहे, हे कधी सांगणार ? वेळेनुसार गाड्या चालवू न शकणार्‍या रेल्वेला अधिभार घेण्याचा अधिकार आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *