Menu Close

बुद्धीभेद करणार्‍या पुरोगाम्यांचे मार्मिक वर्णन हे विचारवंत नव्हे, विचारजंत : डॉ. सच्चिदानंद शेवडे

shevade_pustak_prakashan_clr

पुणे : एखाद्या विषयाच्या संदर्भात स्वतःचा अभ्यास नसूनही जो छातीठोकपणे बोलतो, तो पुरोगामी ! कुठलाही विषय असला, तरी ही मंडळी मत व्यक्त करतात. खोटेे बोला; पण रेटून बोला अशी त्यांची रीत आहे. ज्याची बाजू पडती असते, तो पुष्कळ हातवारे करत बोलतो; कारण त्यांना अज्ञान लपवायचे असते. हे विचारवंत नव्हे, विचारजंत आहेत, असे मार्मिक वर्णन करत ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी ढोंगी पुरोगाम्यांच्या पुरोगामित्वाचा बुरखा फाडला. ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वतीने ६ मार्च या दिवशी येथील मनोहर मंगल कार्यालयात डॉ. शेवडे यांचे हिंदू : काल, आज आणि उद्या या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी नाशिक येथील काळाराम मंदिराचे प्रमुख पुजारी महंत सुधीरदासजी महाराज, समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे, ब्राह्मण जागृती सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. अंकित काणे उपस्थित होते. या वेळी डॉ. सच्चिदानंद शेवडे लिखित सेक्युलर्स, नव्हे फेक्युलर्स या पुरोगाम्यांच्या ढोंगीपणाचा लेखाजोगा मांडणार्‍या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी धडाडीने गोरक्षणाचे कार्य करणार्‍या काही गोरक्षकांचा सत्कार करण्यात आला.

पुरोगाम्यांवर लक्ष्य साधणारे डॉ. शेवडे यांचे वाग्बाण

१. हिंदु आणि हिंदुत्व वेगळे आहे, असे म्हणणारे दिशाभूल करतात. ज्याप्रमाणे माता आणि मातृत्व वेगळे करता येत नाही, त्याप्रमाणे हिंदु आणि हिंदुत्व हेही वेगळे करता येणार नाही.

२. या लोकांना अखलाख आठवतो; पण प्रशांत पुजारी नाही, हा दुटप्पीपणा आहे.

३. कायद्यापुढे सर्व समान म्हणणारे सर्वांना समान कायदा करण्यासाठी म्हणजे समान नागरी कायद्यासाठी मात्र सिद्ध होत नाहीत.

४. सज्जन लोकांनी अथवा स्व-उत्कर्ष बुद्धी असलेल्यांनी इतिहास लिहावा, असे गुलाबराव महाराजांनी सांगून ठेवले आहे. आपण मात्र मोगल, ब्रिटीश यांनी आमच्यावर राज्य केले, असा नकारात्मक इतिहास शिकतो.

आधुनिक शिक्षणामुळे वैदिक धर्मासंदर्भात बुद्धीभेद – महंत सुधीरदासजी

सध्या भाषास्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचा डांगोरा पिटला जात आहे आणि त्या माध्यमातून हिंदुत्व दाबण्याचे अन् धर्म बुडवण्याचे काम केले जात आहे. विद्यापिठांमधून मिळणार्‍या शिक्षणाच्या, तसेच डॉक्टरेट पदवीसाठी असणार्‍या पुस्तकांच्या माध्यमातून हिंदूंचा बुद्धीभेद केला जात आहे. यांमुळे पारंपारिक शिक्षणपद्धतीला छेद दिला गेला आहे. या बुद्धीभेदामुळे जी परंपरा पुढे आली, त्याचे पाईक म्हणजे सध्याचे फेक्युलर्स ! या धाटणीच्या पिलावळीला हिंदु राष्ट्र-धर्म, सनातन विचार नको आहेत.

धर्मशिक्षण आवश्यक ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे

जीवनात संघर्ष करावा लागतो, हे लहानपणापासून शिकवलेच जात नाही. त्यामुळे मनासारखे काही मिळाले नाही की, तरुण पिढी आत्महत्या करते. धर्मशिक्षण नसल्यामुळे तरुण पिढी नैराश्यात जाते. केवळ छोटा भीम पाहून संस्कार होत नाहीत, ते करावे लागतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *