Menu Close

श्रीराम मंदिरासाठी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा : प्रवीण तोगाडिया

श्रीराम मंदिरासाठी हिंदु जनतेची असणारी सिद्धता लक्षात घेऊन सरकार आतातरी राममंदिराच्या निर्मितीसाठी कृतीशील होणार का ?

नागपूर : श्रीराम मंदिरासाठी शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे हे अयोध्येला रवाना झाल्यास देशातील हिंदु जनता भगवा ध्वज खांद्यावर घेऊन त्यांच्या समवेत येईल, असा ठाम विश्‍वास आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी येथे व्यक्त केला.

प्रवीण तोगडिया पुढे म्हणाले की,…

१. मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अनुयायी आहे.

२. भारताला काँग्रेसमुक्त करायला निघालेला भाजप मशिदीच्या रस्त्यावरून ‘वॉलमार्ट’च्या रस्त्यावर गेला; परंतु त्या पक्षाला राम मंदिराचा रस्ता काही दिसला नाही.

३. संघ आणि भाजप यांचे मुस्लिमीकरण चालू झाले आहे. पूर्वीचे सरसंघचालक निर्णय घ्यायचे. आता मोदीचालक निर्णय घेत आहेत. सत्तेपुढे संघाची विचारधारा पालटली आहे. हिंदूंच्या सन्मानासाठी आणि रक्षणासाठी संघाची स्थापना झाली होती; परंतु आता तर ‘हिंदूं’ची व्याख्या पालटणे चालू झाले आहे.

अयोध्येमधील श्रीराम मंदिर न्यासाचे अध्यक्ष जन्मेजयशरणजी महाराज यांनी शिवसेना पक्षप्रमुख श्री. ठाकरे यांना अयोध्येत येण्याचे दिलेले निमंत्रण त्यांनी स्वीकारले असून ते दसर्‍यानंतर शिवसैनिकांसमवेत अयोध्येला जाणार आहेत, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *