चेन्नई : येथील ‘सत्संगामा’ ही मल्याळी संघटना आणि अय्यप्पा धर्म रक्षण समिती यांनी एकत्रितपणे ७ ऑक्टोबर या दिवशी चेन्नई येथे शबरीमला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध मोर्चा काढला होता. अत्यंत शांततेने पार पडलेला हा मोर्चा महालिंगपुराम येथील अय्यप्पा मंदिराजवळ विसर्जित करण्यात आला. या मोर्च्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरुद्ध, तसेच केरळ सरकारने पुनर्विचार याचिका प्रविष्ट न करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याविरुद्ध निषेध व्यक्त करण्यात आला. या मोर्च्यात ‘स्वामी शरणम अय्यप्पा’ असा नामजप करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. जयकुमार आणि पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी मोर्च्यात सहभाग घेतला. त्यांच्यासमवेत इतर अनेक हिंदु संघटनांचे प्रतिनिधीही मोर्च्यात उपस्थित होते. सुमारे २ सहस्र भाविकांनी मोर्च्यात सहभाग घेतला. ‘सत्संगामा’ या मल्याळी संघटनेच्या ‘मातृशक्ती’ या महिला आघाडीच्या अध्यक्षा डॉ. विजयालक्ष्मी यांनी हाती स्वामी अय्यप्पा यांचे चित्र हाती घेऊन मोर्च्याचे नेतृत्व केले. या मोर्च्यास प्रसारमाध्यमांनी उत्तम प्रतिसाद दिला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात