Menu Close

सनी लिओनी यांना ‘चोल’ सम्राज्ञी वीरमादेवी यांची भूमिका देण्यास कर्नाटकातील हिंदु संघटनांचा विरोध

बेंगळूरू : अश्‍लील चित्रपटांतून (पॉर्न फिल्म) काम करणारी अभिनेत्री सनी लिओनी यांना ‘वीरमादेवी’ चित्रपटात भूमिका देण्यावरून येथे विरोध करण्यात येत आहे. सनी लिओनी यांना चित्रपटातून काढून टाकण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. हा चित्रपट चोल साम्राज्याचे शासक राजेंद्र (पहिले) यांची पत्नी वीरमादेवी यांच्या जीवनावर आधारित असून हा चित्रपट या ऑक्टोबर मासामध्ये प्रदर्शित होणार आहे.

हिंदु संघटना कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी सनी लिओनीला ‘वीरमादेवी’ चित्रपटात घेण्यास विरोध केला आहे. कर्नाटक रक्षण वैदिकेचे कार्यकर्ते हरिश पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, आमचा सनी लिओनीने वीरमादेवी यांची भूमिका निभावण्यास पूर्ण विरोध आहे. वीरमादेवी यांचे एक ऐतिहासिक महत्त्व असून सनी लिओनीला ती भूमिका न देता, तिला चित्रपटातून काढून टाकावे, अशी आमची मागणी आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *