इतके दिवस अग्रवाल आमरण उपोषण करत असतांना प्रसारमाध्यमे झोपली होती का ? प्रसारमाध्यमांनी प्रतिदिन या उपोषणाचे वृत्त प्रसारित करून आवाज उठवणे अपेक्षित होते !
नवी देहली : गंगानदीला वाचवण्यासाठी २२ जूनपासून आमरण उपोषण करत असलेले ८६ वर्षीय आयआयटी कानपूरचे माजी प्राध्यापक आणि ज्येष्ठ पर्यावरणवादी जी.डी. अग्रवाल यांचे उपोषणाच्या वेळी निधन झाले. त्यांचे गेले १०९ दिवस उपोषण चालू होते. ते प्रतिदिन केवळ ३ पेले पाणी पीत होते. त्यांना उत्तराखंड पोलिसांनी बलपूर्वक उचलून नेले आणि त्यांना १० ऑक्टोबरला रुग्णालयात भरती केले होते. (गंगानदी वाचवण्यासाठी गेल्या साडेचार वर्षांत भाजप सरकारकडून विशेष काही करण्यात आले नाही, ही वस्तूस्थिती आहे ! एखादी व्यक्ती १०९ दिवस अशा प्रकारे उपोषण करत असतांना शासनकर्ते त्याची साधी नोंदही घेत नाहीत, ही संवेदनशून्यता नव्हे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात