यवतमाळ : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्र-धर्म कार्य करण्यासंदर्भात नुकतेच अधिवक्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्याचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी मार्गदर्शन केले. या वेळी हिंदु विधिज्ञ परिषदेच्या कार्याची माहिती सांगणारा दृश्यपट दाखवण्यात आला. या बैठकीचे आयोजन गोवा येथील सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित राहिलेले अधिवक्ता श्री. आणि सौ. दरणे यांनी केले. या वेळी ७ अधिवक्ता उपस्थित होते.
यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अधिवक्ता बैठकीचे आयोजन
Tags : Hindu Janajagruti Samiti