Menu Close

धर्माचे रक्षण करणे, हे संतसमाजाचे प्रथम कर्तव्य : भूमापिठाधीश्‍वर स्वामी अच्युतानंद तीर्थजी महाराज

Dharam_sansad2
मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे आणि व्यासपिठावर उपस्थित साधू-संतगण

हरिपूर : आज हिंदु धर्मावर टीका करणे आणि मुसलमानांच्या जिहादचे समर्थन करणे हीच धर्मनिरपेक्षता बनली आहे. लोकशाहीच्या नावावर चालू असलेला हा तमाशा आता बंद झाला पाहिजे, असे ठाम प्रतिपादन भूमापिठाधीश्‍वर स्वामी अच्युतानंद तीर्थजी महाराज यांनी केले. धर्माचे रक्षण करणे, हे संतसमाजाचे प्रथम कर्तव्य आहे आणि धर्माच्या रक्षणासाठीच परमात्म्याने त्यांना निर्माण केले असतांना आज हिंदु धर्माची एवढी दारूण अवस्था का झाली ? याचे चिंतन त्यांनी करणे आवश्यक आहे, असेही स्वामी अच्युतानंद तीर्थजी महाराज म्हणाले.

हिंदु धर्माच्या रक्षणासाठी येथील भूमा शक्तिपीठम् येथे धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला धर्मसंसदेचे मुख्य समन्वयक कालिकाम मंदिराचे महंत आणि सनातन हिंदू वाहिनीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सुरेंद्रनाथजी अवधूत, प्रसिद्ध ज्योतिषविद् आणि गीता मनीषी पवन सिन्हा, विश्‍व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय मार्गदर्शक श्री. बी.एल्. शर्मा, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे, हिंदु स्वाभिमानच्या राष्ट्रीय अध्यक्षा चेतना शर्मा यांच्यासह अनेक धर्माचार्य, साधु-संत यांच्यासह ३५ हून अधिक संघटनांच्या प्रतिनिधी सहभागी झाले.

लोकसंख्येचा विस्फोट थांबवण्यासाठी कठोर लोकसंख्या नियंत्रण कायदा करा ! – महामण्डलेश्‍वर स्वामी सहजप्रकाश सरस्वती महाराज, अधिष्ठाता, पावन धाम

देशातील वाढत्या लोकसंख्येचा विस्फोट थांबवण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा करणे आवश्यक आहे. जोपर्यंत शासन असा कायदा करत नाही, तोपर्यंत हिंदूंनी अधिक मुलांना जन्माला घातले पाहिजे. ज्या हिंदु समाजाला मुलांचे संगोपन करण्यात अडचण आहे, त्यांनी ती मुले संत समाजाकडे सोपवावी. संत समाज त्या मुलांना शिक्षण आणि संस्कार देऊन त्यांच्या पायावर उभे करेल आणि नंतर त्यांना त्यांच्या आईवडिलांकडे सोपवेल.

देशाला हिंदुस्थान म्हणून टिकवून ठेवण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

अनेक जिहादी संघटनांसह इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेचे आतंकवादी भारतभरातून पकडले जाऊ लागले आहेत. या इसिसला काश्मीरपासून केरळपर्यंत समर्थन प्राप्त होत आहे. हा उद्याच्या गृहयुद्धाचा शत्रूने केलेला शंखनादच आहे. ही लढाई केवळ सीमेवर नाही, तर प्रत्येक गावात, प्रत्येक रस्त्यावर लढली जाणार आहे; पण आजची स्थिती कशी आहे ? आपले पोलीस आणि सैन्यबळ प्राण हातावर घेऊन या जिहादी संकटांचा सामना करत आहे आणि प्रतीदिन आमच्या वीर सैनिकांना वीरमरण प्राप्त होत आहे. याकरता सीमेवर लढणार्‍या सैनिकांचे आणि अंतर्गत जिहाद्यांविरोधात लढणार्‍या पोलिसांचे हात बळकट करण्यासाठी हिंदूंनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. आजही आपल्या देशाला हिंदुस्थान म्हणून टिकवून ठेवायचे असेल, तर जिहाद्यांच्या विरोधात हिंदूंनी संघटित होणे अत्यंत आवश्यक आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *