Menu Close

अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी भ्रष्ट डॉ. दाभोलकरांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार नाकारावा – हिंदु जनजागृती समितीची मागणी

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. काकोडकर यांना समाजाची दिशाभूल करणारे आणि भ्रष्ट डॉ. दाभोलकरांच्या नावे पुरस्कार मिळणे हा विरोधाभास !

पुणे – सातारा पालिकेच्या वतीने देण्यात येणारा डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार यंदा ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना घोषित झाला आहे. डॉ. काकोडकर यांचे कार्य आणि देशाप्रतीचे योगदान हे निश्‍चितच मोठे आहे; मात्र एका ज्येष्ठ आणि देशभक्त शास्त्रज्ञाला समाजाची दिशाभूल करणारे आणि भ्रष्ट डॉ. दाभोलकरांच्या नावे पुरस्कार मिळणे हा एक विचित्र विरोधाभास आहे. डॉ. दाभोलकर यांनी त्यांच्या हयातीत वैज्ञानिक जाणिवांच्या नावाखाली वैज्ञानिकदृष्ट्या असत्य गोष्टी जनतेच्या माथी मारल्या. त्यांच्या नावाने सामाजिक कृतज्ञता पुरस्कार मिळत असला, तरी डॉ. दाभोलकर यांनी सामाजिक कार्य कधीच केले नाही. सामाजिक कार्याच्या नावाखाली त्यांनी स्वतःच्या कुटुंबाची तुंबडी भरण्याचाच एकनिष्ठेने प्रयत्न केला. हा पुरस्कार न स्वीकारल्याने डॉ. काकोडकर यांची प्रसिद्धी, पद, देशाविषयी योगदान यासंदर्भात तसूभरही फरक पडणार नाही. या उलट आर्थिक घोटाळे करणार्‍या आणि हिंदूंच्या धर्मश्रद्धांवर जाणीवपूर्वक टीका करणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या डॉ. दाभोलकरांच्या नावाने दिलेला पुरस्कार स्वीकारल्यास ‘एक शास्त्रज्ञ दाभोलकारांच्या गैरकारभाराचे आणि खोट्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे समर्थन करत आहे’, असा चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे डॉ. काकोडकर यांनी पुरस्कार नाकारावा आणि समस्त हिंदुंच्या धार्मिक भावनांचा आदर राखावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी केले. 12 ऑक्टोबर या दिवशी येथील पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री. गोखले यांच्यासह सनातन संस्थेचे प्रा. विठ्ठल जाधव यांनीही संबोधित केले.

१. डॉ. दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मुलनाच्या गोंडस नावाखाली हिंदू धर्मातील अनेक परंपराना जाणीवपूर्वक एकांगी विरोध केला. उदा. जलप्रदूषण होते म्हणून सार्वजनिक गणेशोत्सवातील प्लास्टर ऑफ परीस च्या मूर्ती ऐवजी त्यांनी कागदी लगद्याच्या मूर्तीची स्थापना करा, असे आवाहन त्यांनी केले. परंतु त्यानंतर कागद्याच्या लगद्याच्या मूर्तीपासूनच अधिक जलप्रदूषण होत असल्याचे मुंबईच्या प्रसिद्ध रासायनिक तंत्रज्ञान संस्था – ICT (Institute of chemical technology) कडून निष्पन्न झाल्याने राष्ट्रीय हरित लवादा (National Green Tribunal) कडून कागदी लगदा मूर्तींवर बंदी घालण्यात आली.

२. डॉ. दाभोलकर आणि परिवारातील सदस्यांचा समावेश असलेल्या न्यासातील आर्थिक घोटाळे उघड झाले. सातारा येतील सहाय्यक धर्मादाय आयुक्त आणि त्या पाठोपाठ धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग यांनी या न्यासातील घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबत संबंधित कार्यालयाकडून चौकशी सुरु आहे.

३. अशाच गैरकारभारामुळे संबंधित ट्रस्टचा विदेशातील निधी घेण्यासाठी आवश्यक असलेला एफ्. सी. आर. ए. कोड केंद्रशासनाकडून रद्द करण्यात आला आहे.

४. मा. धर्मादाय आयुक्तांना अनेकवेळा खोटी कागदपत्रे वरील ट्रस्ट कडून सादर करण्यात आली आहेत.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *