‘मुलाखत कशी घेऊ नये’, हे शिकवणारे सध्याच्या दूरचित्रवाहिन्यांचे मुलाखत घेणारे !
- आपण बोलावल्याने आलेल्यांचा मान आपण राखला पाहिजे, हेही त्यांना कळत नाही !
- यांच्यामुळे पुढील पिढीवर काय संस्कार होतील, याचा विचारही करवत नाही !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्राच्या वेळी राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे विचार मांडण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे प्रवक्ते, तसेच हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ते यांना निमंत्रित करण्यात येते; मात्र काही हिंदुद्वेषी वृत्तवाहिन्यांचे निवेदक या प्रवक्त्यांशी बोलतांना सर्वसाधारण शिष्टाचाराच्या मर्यादाही पाळत नसल्याचा अनुभव वारंवार येतो. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवरील चर्चासत्राच्या वेळी निवेदक प्रसन्न जोशी, ‘टीव्ही ९ मराठी’ वृत्तवाहिनीच्या निवेदिका निखिला म्हात्रे, ‘रिपब्लिक’ या इंग्रजी वृत्तवाहिनीचे निवेदक अर्णव गोस्वामी, ‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीचे निवेदक राहुल कंवल आदींकडून हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या प्रवक्त्यांशी तावातावाने बोलणे, भूमिका नीट मांडू न देणे, मध्ये बोलून वाक्ये तोडणे, उद्धटपणे प्रश्न विचारणे, हिंदुत्वनिष्ठांना तुच्छ लेखणे, एकांगी चर्चा करणे, विरोधकांना अधिक वेळ देऊन हिंदुत्वनिष्ठांना अल्प वेळ देणे आदी प्रकारे अशोभनीय वर्तन केले जाते. ‘गेस्ट’ अर्थात ‘पाहुणे’ म्हणून वृत्तवाहिन्या स्वतःहून प्रवक्त्यांना बोलावतात, अशा अतिथी म्हणून बोलावलेल्या प्रवक्त्यांशी कसे बोलावे, याचे साधेही भानही या निवेदकांना नसते. असे निवेदक आणि वृत्तवाहिन्या जनतेला दिशा काय देणार ?’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात