गोतस्करांना जमावाकडून होणार्या मारहाणीच्या प्रकरणावर छाती पिटणारे पुरो(अधो)गामी हिंदूंच्या धार्मिक सणांवर धर्मांधांकडून होणार्या आक्रमणांच्या वेळी कुठल्या बिळात लपतात ?
बहराइच (उत्तरप्रदेश) : १० ऑक्टोबरला येथील गायत्रीनगरमध्ये दुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना करण्याला धर्मांधांनी विरोध केला. (अन्य धर्मियांच्या धार्मिक सणांच्या वेळी हिंदु कधी विरोध करतात का ? हिंसाचार करतात का ? तरीही हिंदूंनाच सर्वधर्मसमभावाचे डोस पाजले जातात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्या वेळी त्यांनी केलेल्या दगडफेकीमुळे आणि गोळीबारामुळे २० जण घायाळ झाले. पोलिसांनी या प्रकरणी १५ जणांना अटक केली आहे. ४० ओळखीच्या, तर २५० अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या येथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात