कुठे धार्मिक भावना दुखावतील; म्हणून दर्ग्यावरील फुलांपासून खत बनवण्यास नकार देणारे मुसलमान, तर कुठे पर्यावरणपूरकतेच्या नावाखाली निर्माल्यापासून खत बनवण्याची व्यवस्था करणारे जन्महिंदू !
अजमेर (राजस्थान) : येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यावर वाहण्यात येणार्या फुलांपासून खत बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे; मात्र याला दर्ग्याच्या खादिम समाजाने विरोध केला आहे. त्यांनी फुले देण्यास नकार दिला आहे.
या खादिम समाजाने म्हटले आहे की, हा प्रकार धार्मिक भावना दुखावणारा आहे. यामुळे फुलांचा अवमान होतो. फुलांपासून बनवलेले खत शेतांत घातल्यावर ते पायाखाली येणार. त्यामुळे त्यांचा अवमान होणार. केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या उपस्थितीत वेदांता ग्रुप आणि दर्गा समिती यांच्यात या फुलांपासून खत बनवण्याचा करार झाला होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात