यवतमाळ : जिल्ह्यातील अकोला बाजार तालुक्यामध्ये असलेल्या भांबोरा गावामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्र-धर्मकार्य करण्यासंदर्भात नुकतेच बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीमध्ये उपस्थित २५ युवकांनी उत्स्फूर्तपणे धर्माचरण करण्याचा निर्धार केला. कपाळाला प्रतिदिन टिळा लावणे, दूरभाषवर हॅलो ऐवजी नमस्कार म्हणणे, जय श्रीराम म्हणणे, रामराज्य येण्यासाठी प्रार्थना करणे, धर्मकार्यासाठी वेळ देणे, आठवड्यातून एकदा मंदिरामध्ये एकत्र येणे या कृती करणार असल्याचे धर्माभिमान्यांनी सांगितले.
या बैठकीचे आयोजन तंटामुक्त समितीचे पदाधिकारी स्वप्निल वाटकर आणि संतोष राठोड यांनी केले. या वेळी समितीचे जिल्हा समन्वयक श्री. मंगेश खांदेल उपस्थित होते.