नागपूर : भावी आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी, तसेच वेळ पडल्यास स्वतःसमवेत इतरांना सहकार्य करून त्यांचा जीव वाचवणे ही काळाची आवश्यकता आहे, हे ओळखून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी प्रथमोपचार शिबिरांचे आयोजन केले जाते. त्या अंतर्गत नागपूर येथे ७ ऑक्टोबर २०१८ या दिवशी प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या विदर्भ समन्वयक कु. दिपाली चांदेकर आणि नागपूर येथील सौ. प्रांजली बरडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना हृदय बंद होणे, अपघात, खरचटणे, या प्रसंगी प्रथमोपचार कसे करायला हवेत, याविषयी माहिती दिली आणि प्रात्याक्षिके करून दाखवली. या वेळी उपस्थितांच्या शंकाचे निरसनही करण्यात आले.
नागपूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तृतीय प्रथमोपचार शिबीर
Tags : हिंदु जनजागृती समिती