Menu Close

हिंदुद्वेषी संघटनेच्या सनातनविरोधी ‘ट्विटर ट्रेंड’चा फज्जा !

हिंदुत्वनिष्ठांकडून सनातन संस्थेच्या बाजूने ‘ट्वीट’ करून संस्थेला पाठिंबा !

‘कावळ्यांच्या शापाने गाय मरत नाही’, हे धर्मांध आणि सनातनद्वेषी यांनी लक्षात ठेवावे !

मुंबई : ट्विटर या सामाजिक माध्यमावर सनातन संस्थेला कथित उघडे पाडण्यासाठी १६ ऑक्टोबरला ‘ट्रेंड’ चालू करण्याचे सनातनद्वेष्ट्यांनी घोषित केले होते. त्यानुसार या दिवशी सनातन संस्था, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांवर बिनबुडाचे आरोप करून ‘Companions of Peace and Justice’ नावाच्या संघटनेने ट्विटरवरून ‘#SanatanAgainstIndia’ अशा ‘hashtag’ (एकच विषयावर लोकांना ‘ट्वीट’ करता यावे, यासाठी बनवलेला मथळा. तेथे ‘क्लिक’ करून त्या विषयावर स्वत:ची मते मांडू शकतो.) सामाजिक संकेतस्थळावर प्रसारित केला. सनातनद्वेष्ट्यांनी त्याद्वारे‘ट्वीट’ करून सनातनद्वेष प्रकट केला. या विरुद्ध देशभरातील हिंदुत्वानिष्ठांनी सनातन संस्थेच्या समर्थनार्थ ‘#WeSupportSanatanSanstha’  हा ‘हॅशटॅग’ प्रसारित केला. त्याद्वारे ‘ट्वीट’करून हिंदुत्वनिष्ठांनी हा विषय २ लक्ष १६ सहस्रहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवला.

धर्मांधांच्या आणि सनातनद्वेष्ट्यांच्या या नियोजित षड्यंत्राच्या विरुद्ध हिंदूंना आणि सनातन संस्थेला पाठिंबा देण्याचे आवाहन करणारे ‘ट्वीट’ सर्व स्तरांतील हिंदूंनी प्रसारित केले. या वेळी हिंदूंनी ‘आम्ही तुमच्यासमवेत आहोत’, असे सांगत सनातनला पाठिंबा दर्शवला.

स्वतःला ‘Companions of Peace and Justice’ म्हणवून घेणार्‍या या संघटनेच्या लोकांचे ट्विटर अकाऊंट पाहिले असता हे लोक म्हणजे केवळ धर्मांधांसाठी न्याय मागण्यात धन्यता मानणार्‍या लोकांची संघटना असल्याचे लक्षात आले. या संघटनेकडून पॅलेस्टाईन आणि म्यानमार येथील मुसलमानांसाठी न्याय मागतांना काश्मिरी हिंदु बांधव आणि बांगलादेशी हिंदू यांवर होणार्‍या अत्याचारांविषयी मात्र मौन बाळगण्यात आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *