Menu Close

हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या कार्याबद्दल हिंदुत्वनिष्ठांनी वेळोवेळी काढलेले गौरवोद्गार !

हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासंदर्भात भारत तसेच विदेशातील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांनी वेळोवेळी काढलेले गौरवोद्गार येथे देत आहोत. त्यांचे उद्गार म्हणजे समितीच्या हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी चालू असलेल्या अविश्रांत नि यज्ञरूपी कार्याला मिळालेली पोचपावतीच आहे. श्रीकृष्णकृपेने समिती तसेच अन्य शेकडो हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या संघटित कार्याच्या बळावर या देशाला हिंदु राष्ट्राची सोनेरी पहाट पहावयास मिळेल, याची निश्‍चिती बाळगा !

१. समितीचे हिंदुत्वकार्य असाधारण असल्याचे हिंदुत्वनिष्ठांनी सांगणे !

१ अ. हिंदु जनजागृती समिती म्हणजे देवाने हिंदूंना दिलेला ‘वर’ होय ! : ‘हिंदु समाजाच्या संरक्षणासाठी अनेक संघटना आहेत; मात्र त्यांच्यात उणिवा असल्याने त्यांच्याकडून योग्य कार्य होत नाही. त्यामुळे या संघटनांवरचा हिंदूंच्या मनातील विश्‍वास अल्प होत चालला आहे. हिंदूंचे रक्षण करण्यासाठी आणि हिंदु धर्माच्या पुनरुत्थानासाठी हिंदु जनजागृती समिती कार्य करत आहे. हिंदु धर्माच्या रक्षणासाठी भगवंत अवतार घेतो. आज हिंदु जनजागृती समिती म्हणजे देवाने हिंदूंना दिलेला ‘वर’ आहे.’ – श्री. आकुल कृष्णकिशोर, प्रखर हिंदुत्वनिष्ठ, तिरुपती, आंध्रप्रदेश. (वर्ष २०१३)

१ आ. ‘हिंदु जनजागृती समिती ही हिंंदु राष्ट्र स्थापन करण्याची उघडपणे घोषणा करणारी देशातील पहिली संघटना आहे !’

– श्री. हरिशंकर जैन, सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता तथा ‘हिंदु फ्रन्ट फॉर जस्टिस’चे अध्यक्ष (वर्ष २०१४)

१ इ. हिंदु जनजागृती समितीचे महत्त्व : ‘हिंदु जनजागृती समिती आमच्यासारख्या धर्मबंधूंना एका माळेत ओवण्याचे एक अद्भुत कार्य करत आहे. आम्ही तुकड्यांमध्ये विभागलो गेलो आहोत. ज्या दिवशी आमची ही माळ ओवली जाऊन पूर्ण होईल, त्या दिवशी या देशाला हिंदु राष्ट्र घोषित होण्यास वेळ लागणार नाही.’ – श्री. विनोद सर्वोदय, प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि व्यावसायिक, गाझियाबाद, उत्तरप्रदेश. (वर्ष २०१४) ॐ

१ ई. हिंदु जनजागृती समिती तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज बनवण्याचे कार्य करते !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून मला नेहमीच मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळते. त्यांच्यासारखे नेते समाजाला हवे आहेत. राजकीय नेते निर्माण होऊन हिंदु राष्ट्र कधीतरी स्थापन होईल का ? हिंदु जनजागृती समिती तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज बनवण्याचे कार्य करत आहे ! – आमदार श्री. राजासिंह ठाकूर, तेलंगणा आणि संस्थापक, श्रीराम युवा सेना, भाग्यनगर. (वर्ष २०१५)

१ उ. कायद्याचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी रामराज्य येणे अत्यावश्यक ! : ‘आज कोणीच कायद्याला घाबरत नाही; कारण ‘आपण कोणालाही विकत घेऊ शकतो’, याची कायदा मोडणार्‍याला ठाम निश्‍चिती वाटत असते. कायद्याचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी रामराज्य येणे अत्यावश्यक आहे. हिंदु जनजागृती समिती रामराज्य आणण्यासाठी कृतीशील आहे.’ – श्री. लवू मामलेदार, तत्कालीन आमदार, महाराष्ट्र गोमंतकवादी पक्ष, गोवा. (वर्ष २०१४) ॐ

१ ऊ. हिंदु जनजागृती समिती एका शक्तीच्या रूपात पुढे येऊन हिंदु राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे ! : ‘हिंदु सेवा परिषदेची स्थापना होऊन केवळ २ वर्षे झाली होती. अशा स्थितीत आम्हाला हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शन आणि आधार मिळाला. आई जशी तिच्या लहान मुलाला कुशीत घेते, तसे समितीने आम्हाला तिच्या कुशीत घेतले. आम्हालाच नाही, तर देशातील अनेक लहान लहान संघटनांना समितीने आपल्या कुशीत घेतले आहे. आज ही संघटना एका शक्तीच्या रूपात पुढे येत असून हिंदु राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.’ – श्री. अतुल जेसवानी, प्रदेशाध्यक्ष, हिंदु सेवा परिषद, शिवनी, मध्यप्रदेश. (वर्ष २०१८)

१ ए. समाजव्यवस्थेच्या पुनर्रचनेचे खरे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे ! : ‘आज हिंदूंनाच त्यांच्या धर्माचे ज्ञान नाही. हिंदु जनजागृती समितीप्रमाणे आज कोणतीच संघटना हिंदूंना धर्मशिक्षण देत नाही. समाजव्यवस्थेच्या पुनर्रचनेचे खरे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे.’ – श्री. निरंजन ओझा, फोरम् ऑफ नेपालीज जर्नलिस्ट, नेपाळ. (वर्ष २०१८)

१ ऐ. पाश्‍चात्त्य संस्कृतीचे वाढते आक्रमण थोपवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचा धर्मशिक्षणवर्ग घेण्याचा उपक्रम परिणामकारक ! : ‘दूरचित्रवाहिन्या, चित्रपट, संकेतस्थळे यांमुळे पाश्‍चात्त्य संस्कृतीचे आक्रमण वाढत आहे. त्याला उपाय म्हणून हिंदु जनजागृती समितीने ठिकठिकाणी धर्मशिक्षणवर्ग घेण्याचा उपक्रम चालू केला आहे, तो परिणामकारक आहे.’ – श्री. प्रमोद मुतालिक, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम सेना. (वर्ष २०१३)

२. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी समिती करत असलेल्या कार्याप्रती हिंदुत्वनिष्ठांनी दाखवलेला विश्‍वास !

२ अ. ‘हिंदु जनजागृती समिती’ यांनी हिंदु राष्ट्र निर्मितीचे हे शिवधनुष्य उचलले आहे, त्यासाठी आमची पिढी त्यांची कृतज्ञ राहील.’ – श्री. तपन घोष, संस्थापक अध्यक्ष, हिंदू संहती (वर्ष २०१३)

२ आ. हिंदु जनजागृती समितीसाठी हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय हेच सर्वश्रेष्ठ आहे ! : ‘हिंदु जनजागृती समितीचे ध्येय आणि विचार स्पष्ट आहेत. माझ्या संपूर्ण जीवनात मी अशी संघटना पाहिली नाही. समिती जात, भाषा किंवा प्रांत यांमध्ये कधीच भेद करत नाही. त्यामुळे समितीसाठी हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय हेच सर्वश्रेष्ठ आहे. त्यांचा उद्देश नक्कीच यशस्वी होईल.’ – श्री. गोपाल दास, ज्येष्ठ नेते, विश्‍व हिंदु परिषद, आसाम.

(वर्ष २०१६)

२ इ. हिंदु जनजागृती समिती केवळ भाषणबाजी करत नाही, तर प्रत्यक्ष त्याप्रमाणे कार्य करते ! : ‘मी महाविद्यालयीन काळात अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्य जवळून पाहिले आहे; मात्र हिंदु जनजागृती समिती यांच्यासारखे कार्य कोणीही करत नाही. ही संघटना केवळ भाषणबाजी करत नाही, तर प्रत्यक्ष त्याप्रमाणे कार्य करते. हिंदु जनजागृती समितीचे कार्य कन्याकुमारीच नव्हे, तर संपूर्ण तमिळनाडू राज्यात वाढले पाहिजे.’ – श्री. राधाकृष्णन्, हिंदुत्वनिष्ठ, कन्याकुमारी, तमिळनाडू. (वर्ष २०१३)

३. हिंदु जनजागृती समिती आयोजित विविध अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांमध्ये उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केलेलेे मनोगत !

३ अ. अधिवेशनाला आल्यामुळे सर्व तीर्थांचे फळ मिळाले ! : मी अधिवेशनात इतरांचे विचार ऐकण्यासाठी येतो. येथे मी स्वतःची ‘बॅटरी’ प्रभारित करण्यासाठी येतो. या ठिकाणी आल्यामुळे सर्व तीर्थांना गेल्याचे पुण्य मिळाले. – डॉ. कौशिक चंद्र मलिक, सेवक, शास्त्र-धर्म प्रचारसभा, बंगाल. (वर्ष २०१४)

३ आ. ‘हिंदु जनजागृति समिती’ने हिंदु संघटनांचा समन्वय ठेवून अत्यंत कठीण गोवधर्र्न पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला असणे : ‘हिंदु जनजागृती समिती’ने समन्वयाचा हा (हिंदू अधिवेशनाचा) अत्यंत कठीण गोवधर्र्न पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला आहे, त्या सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. ‘१०० विद्यार्थ्यांसहित माझी कीर्तनशाळा आणि सर्व प्रवचनकार आपल्या कार्याशी सदैव जोडलेले रहातील’, असे आश्‍वासन देऊन मी आपला निरोप घेतो. अनेक धन्यवाद. नमस्कार !’ – श्री. चारुदत्त आफळे, राष्ट्रीय कीर्तनकार, पुणे. (वर्ष २०१३)

४. समितीच्या साधनेच्या शिकवणीसंदर्भात हिंदुत्वनिष्ठांनी दिलेले अभिप्राय !

४ अ. हिंदु जनजागृती समितीविषयी समाजात निर्माण झालेली विश्‍वासार्हता ! : ‘हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून गाजियाबादचे श्री. विनोद सर्वोदयजी यांच्या संदर्भात एक चूक झाल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांची क्षमा मागितली. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘समिती या छोट्या-छोट्या गोष्टीही गांभीर्याने घेते. समितीचे कार्यकर्ते स्वतः प्रायश्‍चित्त घेतात. यामुळेच मी समितीवर प्रेम करतो आणि सगळ्यांना समितीबद्दल सांगतो.’’ – श्री. विनय पानवळकर, देहली (वर्ष २०१४)

४ आ. आध्यात्मिक दृष्टीकोनामुळे समितीचे कार्य पूर्णत्वास जाणार ! : हिंदु जनजागृती समितीकडे आध्यात्मिक दृष्टीकोन आहे. मी पुष्कळ संघटना पाहिल्या आहेत. काही संघटना देश आणि समाज यांची चिंता करतात; पण त्यांच्यात आध्यात्मिकता नाही. त्यामुळे त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाहीत. काही संघटनांमध्ये आध्यात्मिकता आहे; परंतु देश आणि समाज यांच्याप्रती धारणा नाही. म्हणून त्या संघटनांचे कार्य पूर्णत्वाला जात नाही.’

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *