Menu Close

नालासोपारा : गरबा खेळण्यासाठी आलेल्या धर्मांध महिलेचे देवीच्या मूर्तीवर आक्रमण

कारवाईविषयी पोलिसांकडून बोटचेपी भूमिका

  • धर्मांधांना नवरात्रीमध्ये सहभागी करून घेण्यापूर्वी त्यांचा मूर्तीभंजनाचा इतिहास पहा !
  • गरब्यासाठी येणार्‍यांचे ओळखपत्र पहाणार्‍यांवर टीका करणारी प्रसारमाध्यमे अशी वृत्ते लपवतात, हे लक्षात घ्या !
  • धर्मांधांवर कारवाई करण्याविषयी बोटचेपी भूमिका घेणार्‍या पोलिसांनी हिंदूंविषयी अशी भूमिका घेतली असती का ?

नालासोपारा : येथील पश्‍चिम भागातील यशवंत गौरव श्री प्रस्थ या ठिकाणी एका नवरात्रोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या नवरात्रोत्सवात गरबा खेळण्यासाठी आलेल्या धर्मांध महिलेने श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवर आक्रमण केले. यामुळे देवीच्या मूर्तीचा अंगठा तुटून मूर्ती दुखावली गेली. १४ ऑक्टोबरच्या रात्री हा प्रकार घडला. याविषयी मंडळाच्या वतीने नालासोपारा (पश्‍चिम) पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. देवीची मूर्ती खंडित करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या या धर्मांधांविषयी मात्र पोलिसांनी बोटचेपी भूमिका घेतली आहे. या प्रकरणी मारहाणीच्या गुन्ह्यांची कलमे लावून पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. यामुळे हिंदूंमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

एका धर्मांधाने गरबा खेळतांना केलेल्या हुल्लडबाजीमुळे आयोजकांनी त्याला हटकले असतांना त्याने वाद घालण्याचा प्रयत्न केला. या वादाचे मोठ्या भांडणात रूपांतर होऊन त्याच्या समवेत असलेल्या धर्मांध महिलेने मंडपातील देवीच्या मूर्तीवर आक्रमण केले. हे प्रकरण मिटवण्यासाठी पोलिसांकडून मंडळाच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणला जात आहे. (हिंदूंमध्ये धर्माभिमान आणि संघटन यांचा अभाव यांमुळेच हिंदू बहुसंख्य असूनही पोलीस आणि प्रशासन हिंदूंना दुय्यम मानतात. यावर हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमात्र उपाय आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *