Menu Close

पाकमध्ये मुलीवर बलात्कार करणार्या वासनांधास तिच्या वडिलांसमोर दिली फाशी

भारतातही बलात्कार्‍यांना केवळ पीडितांच्या कुटुंबियांच्या समोर नव्हे, तर भर चौकात फासावर लटकवले पाहिजे !

इस्लामाबाद : पाकमधील लाहोर येथील ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात दोषी इमरान अलीला (२४) फाशी देण्यात आली आहे. बुधवारी पहाटे ५.३० वाजता इमरान याला लाहोरमधील कोट लखपत कारागृहामध्ये फासावर लटकवण्यात आले. आरोपी इमरान अलीला फाशी देण्यात आली, तेव्हा तिथे दंडाधिकारी आदिल सरवार आणि पीडित मुलीचे वडील उपस्थित होते. मुलीच्या वडिलांनी आरोपीला फाशी देण्यात आल्यानंतर ‘आम्ही समाधानी आहोत’, अशी भावना व्यक्त केली. पीडित मुलगी ५ जानेवारी २०१८ या दिवशी बेपत्ता झाली होती. यानंतर शहरातील शाहबाज खान रोडजवळ कचरा कुंडीत तिचा मृतदेह सापडला होता.

शवविच्छेदन केले असता मुलीवर बलात्कार झाला असल्याचे निष्पन्न झाले होते. घटनेनंतर केवळ ९ मासांत अन्वेषण करत या प्रकरणाचा निकाल लावण्यात आला. आरोपी पीडित मुलीचा शेजारी होता. बलात्कार केल्यानंतर गळा दाबून तिची हत्या करण्यात आली होती. आरोपी इमरान अलीने चौकशीच्या वेळी त्याने आतापर्यंत अशा प्रकारे ९ मुलींवर बलात्कार केल्याची स्वीकृती दिली होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *