१. ‘ब्रिटीशकालापासून आतापर्यंत केल्या गेलेल्या उपोषणांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात काही साध्य झालेले नाही.
२. प्रभु श्रीराम, भगवान श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज हे शत्रूंपुढे कधीही उपोषणाला बसले नव्हते. त्यांनी शत्रूंशी क्षात्रवृत्तीने लढूनच शत्रूंना पराभूत केले होते.
३. प्रभु श्रीरामासारखा सुसंस्कृत आणि आदर्श राज्यकर्ता असेल, तर त्याच्यापुढे ‘उपोषण करणे’, हे ठीक आहे; पण राज्यकर्ता सुसंस्कृत आणि आदर्श नसेल, तर उपोषणाची साधी नोंदही घेतली जात नाही किंवा केलेले उपोषण व्यर्थ जाते.
४. राष्ट्र आणि धर्म यांविषयीची एखादी तात्कालिक समस्या सोडवण्यासाठी उपोषणासारखे मार्ग अवलंबून हकनाक बळी जाणे, म्हणजे ईश्वराने दिलेल्या मनुष्यजन्माचे मोलच न समजणे होय. ‘साधना करून ईश्वरप्राप्ती करून घेणे’, यातच मनुष्यजन्माचे खरे सार्थक आहे.
५. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या सर्व समस्यांवरील एकमेव उत्तर म्हणजे, सर्व राष्ट्रबांधवांनी संघटित होऊन आदर्श अशा धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्राची (ईश्वरी राज्याची) स्थापना करणे’ होय. ‘संघे शक्तिः कलौ युगे ।’, असे म्हटले आहे. तात्पर्य, ‘कलियुगात संघटित होऊन लढण्यातच सामर्थ्य आहे.’ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या थोर संतांनी सांगितल्याप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटितपणे प्रयत्न केल्यास यश निश्चितच मिळेल, तसेच काळानुसार साधना घडून ईश्वरप्राप्तीही शीघ्र होईल.
‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अविरत कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यात तुम्हीही सहभागी व्हा !’
– (पू.) श्री. संदीप आळशी (१३.१०.२०१८)