Menu Close

सलग तिसर्‍या दिवशीही शबरीमला मंदिरात महिलांचा प्रवेश रोखण्यात यश !

  • हिंदु भाविकांच्या संघटित शक्तीचा परिणाम

  • २५० पोलिसांच्या गराड्यात आलेल्या २ महिलांना परत जावे लागले !

  • मंदिरांच्या मुख्य पुजार्‍यांनीही घेतली भक्तांची बाजू !

  • हिंदूंच्या वज्रमुठीपुढे सरकार, पोलीस, प्रशासन आणि माध्यमे नमली !

हिंदूंच्या धार्मिक भावनांची नोंद घेऊन केंद्रातील भाजप सरकार हिंदूंच्या धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी आता तरी पावले उचलणार का ?

थिरुवनंतपूरम् : हिंदु भाविकांच्या ठाम भूमिकेमुळे सलग तिसर्‍या दिवशीही शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिला प्रवेश करू शकल्या नाहीत. आंध्रप्रदेशची राजधानी असलेल्या भाग्यनगर येथील मोजो टी.व्ही.च्या महिला पत्रकार कविता जक्कल, तसेच तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या रेहाना फातिमा या दोघींना केरळमधील २५० पोलिसांच्या प्रचंड फौजफाट्यात मंदिरापर्यंत नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. (सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश मिळण्यासाठी याचिका प्रविष्ट करणार्‍याचे नाव ‘नौशाद खान’ होते, तर तेथे प्रवेश करू पहाणार्‍या कथित सामाजिक कार्यकर्त्या या ‘रेहाना फातिमा’ आहेत, हे लक्षात घ्या ! हिंदूंच्या धार्मिक परंपरांमध्ये लुडबूड करणार्‍यांचा हा जिहाद ओळखा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) भाविकांनी त्यांना रस्त्यातच अडवले. या वेळी या महिलांसह पोलिसांनाही भाविकांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. शेवटी सरकार, पोलीस आणि प्रशासन यांनी नमते घेत त्या महिलांना परत जाण्यास सांगितले. त्यामुळे सदर महिला परतल्या.

आम्ही सर्व वयोगटातील भाविकांना प्रवेश देऊ; पण कार्यकर्त्यांना नाही ! – केरळ सरकार

वरील प्रकारानंतर केरळ सरकारचे राज्य देवस्वम् (धार्मिक ट्रस्ट) मंत्री काडाकमपल्ली सुंदरन् म्हणाले, ‘‘काही कार्यकर्तेही मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. कोण भाविक आहे आणि कोण कार्यकर्ता ?, हे पडताळणे सरकारला शक्य नाही. तथापि आज मंदिरात प्रवेश करू पहाणार्‍या दोघी महिला या कार्यकर्त्या असल्याचे आम्ही जाणतो. त्यांतील एक महिला पत्रकार आहे. आम्ही सर्व वयाच्या भाविकांना प्रवेश देऊ शकतो; पण कार्यकर्त्यांना येथे येऊन शक्तीप्रदर्शन (स्टंटबाजी) करण्याची अनुमती देऊ शकत नाही.’’ (असे आहे, तर मग सरकारने तब्बल २५० पोलीस केवळ २ महिला कार्यर्त्यांच्या दावणीला का बांधले, याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे ! राज्यासमोर अनेक समस्या आ-वासून उभ्या असतांना अशा कारणांसाठी पोलीसबळ वाया घालवणार्‍या केरळ सरकारला केंद्र सरकार निदान जाब तरी विचारणार आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा ‘केरळ बंद !’

शबरीमला डोंगरावरील प्रसिद्ध श्री अय्यप्पा मंदिरामध्ये सर्व वयाच्या महिलांना प्रवेश खुला करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या निषेधार्थ १८ ऑक्टबरला विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ‘केरळ बंद’ आंदोलन केले. ‘बंद’मुळे राज्यात बस, रिक्शा सेवा ठप्प झाली होती, तर काही ठिकाणी राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक झाल्याचेही प्रकार घडले.

आम्हाला भाविकांशी संघर्ष नको आहे ! – केरळ पोलीस

केरळ राज्याचे पोलीस महानिरीक्षक एस्. श्रीजीत म्हणाले, ‘‘पोलीस शबरीमला मंदिरात कोणत्याही अडचणी निर्माण करणार नाही. आम्हाला भाविकांशी संघर्ष नको आहे. आम्ही केवळ कायद्याचे पालन करू. शबरीमला मंदिराच्या ठिकाणच्या स्थितीची वरिष्ठांना कल्पना देईन.’’

महिलांनी मंदिरात बलपूर्वक घुसण्याचा प्रयत्न केल्यास मंदिराला टाळे ठोकू ! – शबरीमला मंदिराचे मुख्य पुजारी कंदारू राजीवारू

महिलांनी मंदिरात बलपूर्वक घुसण्याचा प्रयत्न केल्यास मंदिराला टाळे ठोकू, अशी सज्जड चेतावणी मुख्य पुजारी कंदरारू राजीवारू यांनी दिली. १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांनी मंदिरात प्रवेश करून नवीन समस्या उभी करू नये, असे आम्ही आवाहन करतो. सर्वोच्च न्यायालय केवळ हिंदूंच्या प्रथा-परंपरांविषयी का बोलते ?

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *