Menu Close

मुंब्रा येथे मदरशामध्ये विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करणार्‍या मौलवीला अटक

कथित लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात हिंदूंच्या संतांची अपकीर्ती करणार्‍या वृत्तवाहिन्या मौलवीच्या कुकृत्याविषयी वृत्त प्रसारित करण्यास टाळतात, हे लक्षात घ्या !

मुंब्रा : येथील उदयनगर भागातील कश्यप अपार्टमेंटमधील मदरशामध्ये शिकणार्‍या ११ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार करणारा मौलवी शब्बीर शेख याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (मौलवींची वासनांध मनोवृत्ती जाणा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

मौलवीने विद्यार्थ्याला भ्रमणभाषमधील अश्‍लील चलचित्र दाखवले. नंतर त्याला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. ही घटना घडल्यापासून पीडित मुलगा मदरशामध्ये जाण्यास टाळाटाळ करत होता. आईला शंका आल्याने त्याने मुलाकडे विचारणा केल्यावर त्याने हा धक्कादायक प्रकार सांगितला. त्यानंतर वरील कारवाई करण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *