Menu Close

मल्हारराव होळकर यांच्याविषयी अनुद्गार काढल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी मागितली क्षमा !

आव्हाड यांच्या तोंडाला काळे फासणार्‍याला धनगर आरक्षण एकीकरण समितीकडून बक्षीस घोषित !

आधी थोर पुरुषांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करायचे आणि प्रकरण अंगलट आले की क्षमा मागण्याचे नाटक करायचे, हे आव्हाड यांचे नेहमीचेच नाटक आहे ! थोर पुरुषांविषयी आदर नसलेले लोकप्रतिनिधी म्हणजे लोकशाहीसाठी कलंक !

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडाला काळे फासणार्‍याला धनगर आरक्षण एकीकरण समितीकडून ११ सहस्र १११ रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले आहे. ‘या देशात वाल्याचा वाल्मीकि होतो आणि मल्ल्याचा मल्हारराव होळकर होतो’, असे वादग्रस्त ट्वीट आव्हाड यांनी केले होते.

मल्हारराव होळकर यांनी मराठेशाहीचा झेंडा अटकेपार फडकवून मुसलमान आक्रमकांना सळो कि पळो करून सोडले होते. धनगर समाजाचे मानबिंदू असलेले मल्हारराव होळकर यांच्याविषयी आमदार आव्हाड यांनी काढलेल्या अनुद्गाराविषयी धनगर समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रकरण अंगलट आल्याचे लक्षात येताच आव्हाड यांनी धनगर समाजाची क्षमा मागितली आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जत (जिल्हा सांगली) पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट

ऊठसूट राष्ट्रपुरुषांची अपकीर्ती करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे लोकप्रतिनिधी यांना येत्या प्रत्येक निवडणुकीत नागरिकांनी मतपेटीच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवून द्यायला हवी !

जत (जिल्हा सांगली) : या प्रकरणात जत पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी ही तक्रार दिली. आव्हाड यांनी विकृत इतिहास लोकांसमोर मांडून मल्हारराव होळकर यांचा अपमान केल्याची भूमिका काही युवकांनीही सामाजिक संकेतस्थळाद्वारे मांडली आहे. महापुरुषांची अपकीर्ती करून विकृत इतिहास मांडणार्‍यांचा प्रयत्न करणारे आव्हाड यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पंढरपूर येथे ‘जोडे मारा’ आंदोलन !

या प्रकरणी पंढरपूर येथे सकल धनगर समाज आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या वतीने आमदार जितेंद्र आव्हाड यांचा प्रतिकात्मक पुतळा उभारून जोडे मारा आंदोलन केले. या वेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना अटक केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *