हिंदूंमधील शौर्य जागृत करणारे प्रदर्शन ! – श्री. अरविंद जैन, सचिव, हिन्दू शौर्य जागरण अभियान
उज्जैन (मध्यप्रदेश) : हिन्दू शौर्य जागरण अभियानचे सचिव श्री. अरविंद जैन यांनी कार्तिक मेळ्यातील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला १८ डिसेंबरला भेट दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश व्हनमारे यांनी श्री. जैन यांना प्रदर्शनातील फलकांविषयी माहिती सांगितली. प्रदर्शनातील फलक पाहून श्री. जैन यांनी हिंदूंना धर्मशिक्षण मिळून त्यांच्यातील शौर्य जागृत करणारे हे प्रदर्शन अत्यंत प्रशंसनीय आहे, या शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. या वेळी त्यांच्या समवेत त्यांचे मित्र श्री. प्रमोद सूद हेही उपस्थित होते. क्षिप्रा नदी काठी लावण्यात आलेल्या या प्रदर्शनास जिज्ञासू आणि मान्यवर यांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभत आहे.
उज्जैन येथील महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकार्यांची प्रदर्शनास भेट !
उज्जैन येथील महाराष्ट्र मंडळाचे उपाध्यक्ष श्री. सुहास बक्षी, सचिव श्री. अभय अरौंदेकर, पूर्वसचिव श्री. नीलेश फडणीस, डॉ. अखिल भागवत आणि अन्य सदस्यांनी प्रदर्शनास भेट दिली. हे प्रदर्शन आवडल्याचे सर्वांनीच सांगितले, तसेच प्रदर्शनातील सात्त्विक उत्पादनेही घेतली.
हिंदु जनजागृती समितीचे प्रदर्शन सिंहस्थ कुंभपर्वातही लावण्यात यावे ! – उज्जैनच्या महापौर सौ. मीना जोनवाल
उज्जैनच्या महापौर सौ. मीना जोनवाल यांनी १८ डिसेंबरला हिंदु जनजागृती समितीच्या प्रदर्शनास भेट दिली. सनातन संस्थेच्या सौ. स्मिता कुलकर्णी यांनी महापौरांना प्रदर्शनातील फलकांविषयी माहिती दिली. प्रदर्शनाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना सौ. जोनवाल म्हणाल्या, हिंदु जनजागृती समितीचे हे प्रदर्शन उपयुक्त आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून हिंदूंना अत्यंत सोप्या भाषेत धर्मशिक्षण दिले जात आहे. सिंहस्थ कुंभपर्वातही हे प्रदर्शन लावण्यात यावे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात