मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या पैशांची सरकारकडून होणारी उधळपट्टी थांबण्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही !
मुंबई : ‘साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवा’ची आठवण म्हणून संस्थानातील कर्मचारी, सर्व आजी विश्वस्त आणि प्रतिनियुक्तीवरील अधिकारी यांना साई प्रतिमा असलेली चांदीची नाणी विनामूल्य दिली जाणार आहेत; मात्र भाविकांना यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. एका नाण्याचे मूल्य अनुमाने १ सहस्र ८४० रुपये असेल. त्यासाठी १० सहस्र चांदीची नाणी भारत सरकारच्या टाकसाळमधून खरेदी केली जाणार आहेत. त्यासाठी १ कोटी ८४ लाख ७० सहस्र रुपये व्यय होणार आहेत. या व्ययासाठी विधी आणि न्याय विभागाने अनुमती देतांना चांदीच्या नाण्याची नोंदवही ठेवण्याची सूचना केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात