Menu Close

गरबा खेळून घरी परतणार्‍या अल्पवयीन मुलीवर धर्मांधाचा बलात्कार

वासनांध धर्मांध !

धर्मांधांच्या दहशतीखाली हिंदूंचे उत्सव ! धर्मांधांच्या वाढत्या अत्याचारांमुळे आता हिंदूंना त्यांचे उत्सव सुरक्षित आणि निर्भय वातावरणात साजरे करणे अवघड झाले आहे.

मुंबई : गरबा खेळून घरी परतणार्‍या एका ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी सिराज मेहंदी हसन खान (३०) याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना साकीनाका परिसरात घडली आहे. पीडित मुलगी आणि तिचा ११ वर्षांचा मित्र दोघे गरबा खेळून झाल्यानंतर घराच्या दिशेने येत असतांना १६ ऑक्टोबर या दिवशी रात्री ही घटना घडली. आरोपीने या मुलीच्या मित्राला मारहाण करून पळून लावल्यावर त्याने या मुलीवर बलात्कार करून तिला ठार मारण्याची धमकी दिली होती. (हिंदूंनो सर्वत्रच्या धर्मांधांच्या वाढत्या अत्याचाराला प्रतिकार करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सबल बनले, तरच आपला निभाव लागणार आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

या आरोपीला पोलिसांनी २४ घंट्यांच्या आत साकीनाका येथून अटक केली. पोलिसांनी आरोपीचा भ्रमणध्वनी जप्त केला आहे. गुन्हा करण्यापूर्वी त्याने अल्पवयीन मुलींची छायाचित्रे काढली होती. पोलिसांनी या प्रकरणी सिराजसह १६ जणांना कह्यात घेतले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *