सत्तेत येऊन ४ वर्षे झाली, तरी भाजपने राम मंदिराचे सूत्र पूर्णत्वाला नेले नाही. त्यामुळे आता हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत झाला असून हिंदूंना ठोस कृतीच अपेक्षित आहे ! हिंदूंच्या मतावर निवडून आलेले सरकार याचा विचार करील का ?
मुंबई : राम मंदिरासाठी आता कायदा झाला नाही, तर पुन्हा कधीच होणार नाही. आज आपल्याकडे बहुमत आहे. वर्ष २०१९ मध्ये काय होईल, हे आज सांगता येत नाही. हा श्रद्धेचा विषय असल्याने न्यायालयात त्यावर तोडगा निघेल, असे वाटत नाही. हा राजकीय इच्छाशक्तीचा प्रश्न आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच राजकीय इच्छाशक्ती दाखवून हा प्रश्न सोडवू शकतात, असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले.
ते पुढे म्हणाले, ‘‘असदुद्दीन ओवैसी यांनी हैदराबादपर्यंतच मर्यादित रहावे. राम मंदिर अयोध्येत बांधले जाणार आहे. हैदराबाद, पाकिस्तान आणि ईराणमध्ये बांधले जाणार नाही. ओवैसींसारखे लोक मुसलमान समाजाची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत, त्यामुळे या समाजाची मोठी हानी होण्याची शक्यता आहे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात