-
शबरीमला मंदिराची सहस्रो वर्षांची परंपरा टिकून रहाण्यासाठी संघटित झालेले केरळमधील धर्माभिमानी हिंदू !
-
पोलिसांनी संरक्षण न पुरवल्याने मंदिरात प्रवेश करण्यासाठी आलेल्या मेरी स्विटी या महिला माघारी परतल्या !
-
शबरीमला मंदिरात आणखी एका महिलेचा प्रवेश करण्याचा प्रयत्न !
थिरुवनंतरपूरम् : शबरीमला मंदिरात एका ३८ वर्षीय महिलेने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. एस्.पी. मंजू असे तिचे नाव असून ती एका मागासवर्गीय संघटनेची पदाधिकारी असल्याचे सांगितले जात आहे.
शबरीमला मंदिरात प्रवेश करणार्या तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या रेहाना फातिमा आणि भाग्यनगर येथील पत्रकार कविता जक्कल यांना मागे फिरावे लागल्याची घटना घडूनही मंजू यांनी मंदिरात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी तिला तिच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यास सांगितले; मात्र तिने मतावर ठाम असल्याचे सांगितले. पोलिसांनी फातिमा आणि जक्कल यांच्याप्रमाणेच मंजू यांनाही मंदिर प्रवेशासाठी संरक्षण पुरवणार असल्याची सांगितले. दुसरीकडे १० ते ५० वर्षे वयोगटांतील महिलांना मंदिरात प्रवेश रोखण्यासाठी सहस्रो भाविकांचे शबरीमला मंदिराच्या बाहेर श्री अयप्पा स्वामींच्या नामस्मरणात चौथ्या दिवशी आंदोलन चालूच आहे.
मेरी स्विटी नावाच्या महिलेला परत जावे लागले !
‘शबरीमला मंदिरात मेरी स्विटी नावाच्या ४६ वर्षीय महिलेकडूनही शबरीमला मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला. (मेरी स्विटी या नावावरून ती अन्य पंथीय आहे, असे भाविकांना वाटते. अन्य पंथियांकडून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवण्याचा हा अश्लाघ्य प्रकार रोखणे आवश्यक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) तथापि पोलिसांनी तिला संरक्षण न देताच परत पाठवले’, असे वृत्त एन्.डी.टी.व्ही. या वृत्तवाहिनीने प्रसारित केले आहे.
शबरीमला मंदिरात प्रवेश करू पहाणार्या रेहाना फातिमा यांच्या घराची तोडफोड !
शबरीमला मंदिरात प्रवेश करू पहाणार्या तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या रेहाना फातिमा यांच्या घरावर अज्ञातांनी आक्रमण करून घराची तोडफोड केली. शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यासाठी पोलिसांनी रेहाना फातिमा आणि भाग्यनगर येथील पत्रकार कविता जक्कल यांना तब्बल २५० पोलिसांचे संरक्षण पुरवले. पोलिसांच्या गराड्यात त्या मंदिराच्या दिशेने जात असतांना त्यांना असंख्य हिंदु भाविकांनी रोखले, तसेच त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तेथील वातावरण चांगलेच तणावपूर्ण बनल्याने पोलिसांनी भाविकांसमोर माघार घेत रेहाना फातिमा यांना परत नेले. या संपूर्ण घटनेच्या वेळी अज्ञातांनी रेहाना यांच्या कोची येथील घरावर आक्रमण केले. त्यांनी घरावर जोरदार दगडफेक केली, घरातील वस्तूंची तोडफोड केली, तसेच अनेक वस्तू रस्त्यावर फेकून दिल्या. त्यामुळे आता फातिमा यांच्या घराच्या बाहेरही कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शबरीमला प्रकरणी निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती पहाता केंद्रीय गृहमंत्रालयाने केरळसह तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांनाही कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्याची चेतावणी दिली आहे.
हिंदु विरोधकांच्या प्रतिक्रिया !
१. (म्हणे) ‘माझ्या कुटुंबाला धोका आहे !’ – तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या रेहाना फातिमा
घरावरील आक्रमणाच्या घटनेविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना त्या म्हणाल्या, ‘‘माझ्या मुलांचे काय झाले असेल, मला ठाऊक नाही. आता माझ्याही जीवाला धोका आहे; पण माझा पोलीस आणि प्रशासन यांच्यावर पूर्ण विश्वास असून ते मला नक्कीच संरक्षण पुरवतील. मंदिराच्या परिसरात भाविक नव्हे, तर अन्य लोक महिलांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखून शांतता भंग करत आहेत. अशांना भक्त कसे म्हणणार ?
२. (म्हणे) ‘शबरीमलाचे आंदोलन बाबरी विध्वंसाच्या आंदोलनाप्रमाणे !’ – सीताराम येच्युरी, माकपचे नेते
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येच्युरी यांनी हिंदु भाविकांच्या आंदोलनावर ‘शबरीमलाचे आंदोलन बाबरी विध्वंसाच्या आंदोलनाप्रमाणे आहे’, अशा शब्दांत टीका केली. (साम्यवाद्यांचा इतिहास पडताळला, तर त्यांचे हात हत्या, अन्याय आणि अत्याचार यांनी बरबटले आहेत, हे आपल्याला दिसून येईल. हा इतिहास असतांना येच्युरी यांनी अशी टीका करणे हास्यास्पद ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. (म्हणे) ‘आम्ही मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, याविषयी आम्हाला स्वतःवर गर्वच वाटत आहे !’ – तथाकथित पत्रकार कविता जक्कल
शबरीमला मंदिरात प्रवेश करू पहाणार्या तथाकथित पत्रकार कविता जक्कल म्हणाल्या, ‘‘आम्ही प्रचंड धोकादायक स्थितीचा सामना केला. आम्हाला मंदिरापर्यंत नेण्यासाठी पोलिसांनी सर्व बाजूंनी प्रयत्न केले; पण आंदोलनकर्त्यांनी आम्हाला पुढे जाऊ दिले नाही. त्यामुळे आम्हाला परत जावे लागले. आम्ही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, याविषयी आम्हाला स्वतःवर गर्वच वाटत आहे. आम्हाला पाठिंबा देणार्या सर्वांचे आभार मानते.’’
हिंदु भाविकांच्या बाजूच्या प्रतिक्रिया !
१. शबरीमला मंदिर हे भगवान श्री अय्यप्पाचे निवासस्थान असून अश्लीलतेचे ठिकाण नव्हे ! – प्रयार गोपालकृष्णन्, ‘त्रावणकोर देवास्वम् मंडळा’चे माजी अध्यक्ष
शबरीमला मंदिरावरून काही मोजक्या निधर्मींनी घातलेल्या गोंधळामुळे ‘त्रावणकोर देवस्वम् मंडळा’चे माजी अध्यक्ष प्रयार गोपालकृष्णन् यांनी ‘शबरीमला मंदिर हे भगवान श्री अय्यप्पाचे निवासस्थान असून अश्लीलतेचे ठिकाण नव्हे, अशा शब्दांत त्यांना फटकारले.
शबरीमला प्रकरणावरून सध्या वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी ‘त्रावणकोर देवस्वम् मंडळ’ फेरविचार याचिका प्रविष्ट करणार आहे.
२. रेहाना फातिमा यांनी पोलिसांची वर्दी घालणे सर्वथा अयोग्य ! – काँग्रेसचे नेते आर्.आर्. चेन्नीथल्ला
शबरीमला प्रकरणावरून केरळमधील काँग्रेसचे नेते आर्.आर्. चेन्नीथल्ला यांनी केरळचे राज्यपाल पलानीसामी सथासिवम् यांची भेट घेऊन त्यांना शबरीमला मंदिरात तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या रेहाना फातिमा आणि पत्रकार कविता जक्कल यांच्या मंदिरप्रवेशाच्या हट्टामुळे उद्भवलेल्या परिस्थितीविषयी अवगत केले. या वेळी चेन्नीथल्ला म्हणाले, ‘‘शबरीमला मंदिरात केवळ हिंदूच नव्हे, तर अन्यही धर्मातील लोक मंदिराच्या दिशेने जात आहेत. त्यामुळे सर्व जण चिंतित आहेत. सामाजिक कार्यकर्त्या रेहाना फातिमा यांना संरक्षणात घेऊन जातांना त्यांना पोलिसांची वर्दी घालण्यात आली होती. हे सर्वथा अयोग्य आहे. शबरीमला मंदिर पर्यटक केंद्र नसून तेथे केवळ भाविकच जाऊ शकतात. शबरीमला प्रकरणात केरळ पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची आहे.’’
३. मंदिराच्या प्रथा-परंपरांत कोणीही हस्तक्षेप करू नये ! – सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत
सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत म्हणाले, ‘‘प्रत्येक मंदिराच्या काही प्राचीन प्रथा-परंपरा असतात. अनंत काळापासून भाविक त्याचे मोठ्या श्रद्धेने पालन करत असतात. त्यामुळे त्या प्रथा-परंपरांत कोणीही हस्तक्षेप करू नये, अशी माझी नम्र सूचना आहे.’’
शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश निषिद्ध असतांना तेथील हिंदूंच्या धार्मिक परंपरांमध्ये लुडबूड करणार्या धर्मांधांचा जिहाद जाणा !
‘हिंदु भाविकांच्या ठाम भूमिकेमुळे आतापर्यंत शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिला प्रवेश करू शकल्या नाहीत. आंध्रप्रदेशची राजधानी असलेल्या भाग्यनगर येथील मोजो टी.व्ही.च्या महिला पत्रकार कविता जक्कल, तसेच तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या रेहाना फातिमा या दोघींना केरळमधील २५० पोलिसांच्या प्रचंड फौजफाट्यात मंदिरापर्यंत नेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना मंदिरात प्रवेश मिळण्यासाठी याचिका प्रविष्ट करणार्याचे नाव ‘नौशाद खान’ होते, तर तेथे प्रवेश करू पहाणार्या कथित सामाजिक कार्यकर्त्या या ‘रेहाना फातिमा’ आहेत, हे लक्षात घ्या !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात