Menu Close

चोपडा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विजयादशमीनिमित्त सामूहिक शस्त्रपूजन !

भाजप नेते घनश्याम अग्रवाल यांच्या हस्ते पूजन

चोपडा (जिल्हा जळगाव) : येथे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सामूहिक शस्त्रपूजन करण्यात आले. हिंदूंमध्ये क्षात्रवृत्ती जागृत व्हावी आणि हिंदूंनी संघटित व्हावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या वेळी प्रथम प्रभु श्री रामचंद्रांंच्या तैलचित्राचे पूजन आणि माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर सामूहिक शस्त्रपूजन भाजप नेते घनश्याम अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. सीमोल्लंघन करून आल्यावर हिंदु धर्माभिमान्यांनी छत्रपती शिवाजी चौकात येऊन प्रभु श्रीरामचंद्राचे आणि शस्त्रांचे पूजन करून एकमेकांना दसर्‍याच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी चोपडा शहरातील अनेक मान्यवर आणि अधिकारी उपस्थित होते.

हिंदु जनजागृती समितीचे कार्य कौतुकास्पद ! – घनश्याम अग्रवाल

या वेळी भाजप नेते घनश्याम अग्रवाल म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृतीचे सर्वच उपक्रम हे नियोजनबद्ध असून समाज संघटित करण्यासाठीचे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.’’

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *