अन्य पंथियांच्या मंदिरातील अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करण्याचे धाडस न दाखवणारे पुरो(अधो)गामी, तसेच निधर्मी यांनी आता श्री महाबलेश्वर मंदिर व्यवस्थापनाच्या या निर्णयाला विरोध केल्यास आश्चर्य वाटणार नाही !
बेंगळुरू : कर्नाटकमधील गोकर्ण येथील श्री महाबलेश्वर मंदिरात भाविकांना जीन्स पॅन्ट आणि ‘बरमूडा’ (छोटी पॅन्ट) घालून प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुरुषांना धोतर, तर महिलांना साडी अथवा सलवार-कुर्ता परिधान करूनच या मंदिरात प्रवेश करता येणार आहे.
श्री महाबलेश्वर मंदिराचे कार्यकारी अधिकारी एच्. हलप्पा म्हणाले, ‘‘ही बंदी प्रथमपासून होतीच; मात्र गेल्या मासापासून आम्ही त्याची कार्यवाही करणे चालू केले आहे. पुरुषांना शर्ट, हॅट, टोपी, तसेच कोट घालून मंदिरात प्रवेश करता येणार नाही.’’ या मंदिराची निर्मिती ४ थ्या शतकात कदंब राजवंशाचे मयूर शर्मा यांनी केली होती. कर्नाटकमधील ‘हिंदु धार्मिक संस्थान एवं परमार्थ दान’ या विभागातील अधिकारी म्हणाले, ‘‘श्री महाबलेश्वर मंदिरात लागू करण्यात पेहरावाचे नियम हम्पी येथील श्री विरूपाक्ष मंदिरातही लागू आहेत. ते मंदिर ७ व्या शतकातील आहे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात