- मंदिर प्रवेशाच्या प्रकरणी हिंदूंचा एवढा विरोध होऊनही केरळमधील साम्यवादी सरकार सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका प्रविष्ट करत नाही, हे लक्षात घ्या ! हिंदूंनी ज्या सरकारला निवडून दिले, त्या सरकारच्या लेखी हिंदूंच्या धार्मिक भावनांना काय मूल्य आहे, हे यावरून लक्षात येते ! सरकारने अशी भूमिका अन्य पंथियांच्या विषयी घेतली असती का ?
- लोकशाहीच्या चारही स्तंभांचे काडीइतकेही पाठबळ नसतांना केवळ भगवान श्री अय्यप्पा यांच्यावरील श्रद्धेच्या बळावर सलग ५ दिवस यशस्वी आंदोलन करणार्या हिंदूंकडून इतरत्रच्या हिंदूंनी बोध घ्यावा !
थिरुवनंतपुरम् : शबरीमला मंदिरात १० ते ५० वयोगटांतील महिलांना प्रवेश न देण्याच्या सूत्रावरून हिंदु भाविकांचे सलग ५ व्या दिवशीही आंदोलन चालूच होते. भाविकांच्या संघटित विरोधामुळे आणखी २ महिलांना दर्शनाविनाच परत जावे लागले. सध्या येथे भाविकांच्या संघटितपणापुढे सरकार आणि पोलीस नमले असल्याचे चित्र आहे. या घटनेनंतर केरळच्या पोलीस महासंचालकांनी मात्र ‘सदर महिलांना शबरीमला मंदिरातील विशिष्ट वयोगटांतील महिलांच्या प्रवेशाविषयीचा नियम ज्ञात नव्हता. त्यांना तो सांगितल्यावर त्यांनी स्वतःहूनच तेथे न जाण्याचा निर्णय घेतला’, असे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
रेहाना फातिमा यांची मुसलमान समाजातून हाकालपट्टी !
शबरीमला मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या रेहाना फातिमा यांची त्यांच्या परिवारासह ‘मुस्लिम जमात काऊन्सिल’ने समाजातून हाकालपट्टी केली. ‘मुस्लिम जमात काऊन्सिल’चे अध्यक्ष ए. पूकुंजू यांनी ही माहिती दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात