परभणी : येथील जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध राष्ट्रीय समस्यांविषयी निवेदने देऊन पुढील मागण्या करण्यात आल्या.
१. जानेवारी २०१९ पासून चालू होणार्या कुंभमेळ्याला भक्तांना रेल्वे तिकिटासाठी अतिरिक्त पैसे आकारले जात आहेत. हा अतिरिक्त आकार रहित व्हावा.
२. ऑनलाईन वेश्याव्यवसाय चालवत असलेल्या संकेतस्थळांवर त्वरित कारवाई व्हावी.
३. सध्या चर्चेत असलेल्या ननवरील बलात्कार आणि मुले गायब होणे या चर्च आणि मिशनरी संस्था यांच्याशी संबंधित आरोपांच्या संदर्भात चर्च आणि मिशनरी संस्था यांची चौकशी व्हावी.
४. चिनी फटाक्यांच्या विक्रीवर, तसेच देवतांची वेष्टने असणार्या फटाक्यांच्या विक्रीवर प्रतिबंध आणण्यासाठी संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करावी.
या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री मंदार कुलकर्णी, अशोक नाकाडे, स्वप्निल पिंगळकर, श्रीनिवास दीवाण आणि नितिन राठौड आणि वैभव आफळे उपस्थित होते.