- काँग्रेसप्रमाणे भाजपच्याही राजवटीत हिंदूंची परवड चालूच ! राज्यात किंवा केंद्रात कोणाचेही सरकार आले, तरी हिंदूंची गळचेपी थांबत नाही, उलट त्यात वाढच होते, हे प्रतिदिन घडणार्या घटनांवरून सिद्ध होते. हिंदूंनो, यास्तव आता तरी हिंदु राष्ट्र स्थापा !
- पोलिसांनी असा बळाचा वापर कधी अन्य पंथियांवर करण्याचे धाडस केले आहे का ?
- सर्व निर्णय (मग त्यात हिंदूविरोधी निर्णयही आले) हे घटनेतील तरतुदींच्या आधारे घेतले जात असल्याचे वारंवार सांगण्यात येते; तथापि काँग्रेसने घटनेलाच ‘निधर्मी’ केल्याने अन् भाजप ते पालटत नसल्याने हिंदूंच्या हिताचे निर्णय घेतले जातांना दिसत नाहीत ! यास्तव सतत संघर्ष करत बसण्यापेक्षा हिंदूंनीच आता धर्माधिष्ठित घटना असणार्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे !
जबलपूर (मध्यप्रदेश) : येथील ग्वारीघाट भागात श्री कालीमातेच्या मूर्तीचे नर्मदा नदीत विसर्जन करण्यास पोलिसांनी विरोध केल्याने भाविक आणि पोलीस यांच्यात वादावादी झाली. या वेळी पोलिसांनी बळाचा वापर करत भाविकांवर थेट लाठीमार चालू केला. (हिंदूंवर मर्दुमकी गाजवणारे पोलीस धर्मांधांसमोर मात्र नांगी टाकतात, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) यामुळे जमाव चांगलाच संतप्त झाला. त्यानंतर संतप्त जमावाने दगडफेक केली, गाड्या पेटवल्या, तसेच काही वाहनांची तोडफोड केली, असा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३५ जणांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक अर्जुन उइके यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘नर्मदा नदीमध्ये देवीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यास बंदी असल्याचे सांगून जमावाला रोखल्यानंतर त्याने दगडफेक केली.
यामध्ये १० पोलीस घायाळ झाले. जमावाने काही गाड्या पेटवल्या, तसेच ४-५ गाड्यांची तोडफोड केली. यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.’ तथापि ‘प्रथम पोलिसांनी भाविकांवर लाठीमार केल्यामुळेच जमाव भडकला’, असे सांगण्यात आले. (पोलिसांचा खोटारडेपणा उघड ! पोलिसांना प्रशिक्षण देतांना खरे बोलण्याचेही प्रशिक्षण द्यायला हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
प्रदूषणामुळे मूर्तींचे नर्मदानदीत विसर्जन न करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश
या निर्णयामुळे ‘शबरीमला प्रकरण, मूर्तीविसर्जन आदींसारख्या हिंदूंच्या धार्मिक परंपरांविषयी निर्णय घेतांना हिंदूंच्या धर्माचार्यांचे मत विचारात का घेतले जात नाही ?’ असा प्रश्न हिंदूंना पडल्यास आश्चर्य ते काय ?
प्रदूषणाचे कारण पुढे करत मूर्तींचे नर्मदानदीत विसर्जन न करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम हौद बनवण्यात आला असून त्या हौदात मूर्तींचे विसर्जन करण्याचा पोलिसांचा आग्रह होता. तथापि भाविक परंपरेप्रमाणे नर्मदानदीत मूर्तीचे विसर्जन करण्यावर ठाम होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात